आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Separate Commissioner For The Irrigation Nitin Rout

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जलसंधारणाची कामे जलदगतीने होण्‍यासाठी आता स्वातंत्र आयुक्तालय- नितीन राऊत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- राज्यातील जलसंधारणाची कामे जलदगतीने व्हावी आणि रोजगारांना कामाच्या अधिक संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी एक स्वतंत्र आयुक्तालय तयार करण्याचे काम राज्यशासनाने हाती घेतले आहे. हे काम अंतिम टप्प्यात असून लवकरच मुख्यमंत्र्यांच्या स्वाक्षरीनंतर ते कार्यान्वित होईल, अशी माहिती राज्याचे रोजगार हमी आणि जलसंधारण मंत्री नितीन राऊत यांनी मंगळवारी दिली. जळगावातील ‘दिव्य मराठी’ कार्यालयाला दिलेल्या सदिच्छा भेटीत त्यांनी विविध विषयावर संवाद साधला.

सध्या जळगावमध्ये महापालिका निवडणूकांचे पडघम सुरू आहेत. या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी डॉ. राऊत शहरात आले होते. दिव्य मराठी कार्यालयाला त्यांनी दिलेल्या सदिच्छा भेटीच्या वेळी माजी खासदार डॉ.उल्हास पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष उदय पाटील, महिला पदाधिकारी ज्योत्स्ना विसपुते उपस्थित होते. या भेटीत डॉ. राऊत यांनी राज्यातील रोहयो व जलसंधारणाच्या कामांचा आढावा घेऊन पुढील योजनांबाबत सविस्तर चर्चा केली.

ग्रामीण जीवनाच्या प्रगतीचा आधार बनलेल्या तसेच मागेल त्याला काम आणि केलेल्या कामाचा उचित मोबदला देणे हे महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेचे उद्दिष्ट आहे. सिंचन, विहिरी, शेतरस्ते, रस्ता सरळीकरण यासह बंधारे, पाझर तलाव सामाजिक वनीकरण आदी अनेक कामे या माध्यमातून करण्यात येत आहेत.

राज्यात रोजगार हमीची योजना ही गरिबांसाठी काँग्रेस सरकारने बॅकअप योजना म्हणून सुरू केली आहे. उपेक्षित राहिलेल्या या विभागाचे खाते सांभाळल्यानंतर आपण त्याचे पुनरुज्जीवन केले आहे. सुमारे 2200 कोटी रुपयांची कामे या वर्षात पूर्ण केली जाणार आहेत, असे डॉ. राऊत म्हणाले.


महिलांची संख्या वाढली
तळागाळातील लोकांपर्यंत विकासाचा लाभ पोहोचावा, यासाठी रोहयो योजनेत बदल करून अधिक सुलभ आणि सुटसुटीत करण्यात आली आहे. दुष्काळी स्थितीत योजनाबद्ध पद्धतीने काम सुरू आहे. गावाजवळ रोजगार उपलब्ध होत असल्यामुळे कामांवर 48 टक्के महिलांची उपस्थिती लाभत आहे. पुरुषांचे प्रमाण कमी असून ते वाढविण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. शिक्षण व औद्योगिकरणामुळे पुरुषांची मानसिकता बदलत आहे, असे डॉ. राऊत यांनी या वेळी सांगितले.