आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुकानाचे कुलूप उघडून नोकरानेच कापला गल्ला, ‘बीजे’मध्ये दुकानात चाेरीचा प्रयत्न फसला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - बीजे मार्केटमधील दुकानात मंगळवारी सकाळी ८.१५ वाजता दुकानातील नाेकरानेच चाेरीचा प्रयत्न केला. मात्र, एेनवेळी दुसरा नाेकर अाल्याने चाेरीचा प्रयत्न फसला. याप्रकरणी जिल्हापेठ पाेलिसांत गुन्ह्याची नाेंद केली असून पाेलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज ताब्यात घेतले अाहेत. 
 
बीजे मार्केटमध्ये जुन्या रेडक्राॅस साेसायटीसमाेर असलेले दुकान क्रमांक ३०३/ए मध्ये विजय पुरुषाेत्तम बाेरसे (वय ४५) यांच्या मालकीचे अॅल्युवर्ल्ड नावाचे अॅल्युमिनिअमच्या खिडक्या अाणि काचेचे तावदान तयार करण्याचे दुकान अाहे. शनिवारी रात्री ८.३० वाजता बाेरसे यांनी दुकान बंद केले हाेते. त्यानंतर रविवारी दुपारी १२.३० वाजता बाेरसे यांनी पुन्हा थाेडा वेळ दुकान उघडून बंद केले. त्यानंतर साेमवारी धूलिवंदनामुळे दुकान बंद असल्याने ते नाशिक येथे निघून गेले. रात्री ८.१५ वाजतापरत अाले. 

मंगळवारी सकाळी ८.४० वाजता त्यांच्या दुकानावर काम करणारा शफीक शेख हा नाेकर दुकानाजवळ अाला. त्याने दुकानाचे कुलूप उघडे असून अर्धे शटरही उघडलेले असल्याचा फाेन बाेरसे यांना केला. दुकानाची एक किल्ली बाजूला दुर्गादास भावसार यांच्या चहाचे दुकानावर ठेवलेली असते. त्यामुळे बाेरसे यांनी शफीकला त्यांना विचारण्यासाठी पाठवले.
 
शफीकने भावसार यांच्याकडे चाैकशी केली. त्या वेळी त्यांनी दुकानावरील दुसरा नाेकर विशाल विजय सनेर (रा. कुसुंबा) हा सकाळी ८.१५ वाजता किल्ली घेऊन गेल्याचे सांगितले. त्यानंतर शफीक याने दुकानावर येऊन बघितले तर विजय चाेरी करीत हाेता. शफीकला पाहून विजयने धूम ठाेकली. याविषयी त्याने बाेरसे यांना फाेन करून चाेरी झाल्याची माहिती दिली. 
 
अशी केली चाेरी 
विशालयाने मंगळवारी भावसार यांच्याकडून दुकानाची किल्ली घेतली. त्याने इलेक्ट्रीक कटर, हाताेडी अाणि स्क्रू ड्रायव्हर घेतला. त्यानंतर दुकान बंद करून मालक बसत असलेले दुकान उघडले. तेथे इलेक्ट्रीक कटरने गल्ल्याचा ड्राॅवर ताेडण्याचा प्रयत्न करीत हाेता. त्या वेळी शफीक दुकानावर अाल्याचे विशालला समजले. त्यामुळे त्याने खालूनच पळ काढला. त्याला काही दुकानदारांनी बघितले. मात्र, काेणालाही शंका अाली नाही. दरम्यान, बाेरसे मांॅ वैष्णवी मार्केटिंगने बक्षीस याेजना चालवतात. त्यात ते सभासदाकडून पैसे जमा करून बक्षीस वाटप करतात. शनिवारी या याेजनेचे सव्वा लाख रुपये जमा झाले हाेते. ते सुदैवाने वाचले. याप्रकरणी जिल्हापेठ पाेलिसांनी सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले अाहे. विशालच्या कुसुंबा येथील घरीही पाेलिसांचे एक पथक जाऊन अाले. 
बातम्या आणखी आहेत...