आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेवा शुल्कातून घरांची देखभाल शक्य, तात्पुरत्या वास्तव्यामुळे झटकली जाते जबाबदारी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- शासकीय कर्मचा-याची दर तीन वर्षांनी बदली होत असल्याने या वसाहतींकडे पाहण्याचा कर्मचाऱ्यांचा दृष्टिकोनही उदासीन आहे. या घरांमध्ये तात्पुरते वास्तव्य करायचे असल्यामुळे प्रत्येक जण आपली जबाबदारी झटकतो.
काही कर्मचारी आपल्या सोयीप्रमाणे घरांची डागडुजी करून घेतातही परंतु कायमस्वरुपी देखभाल-दुरुस्ती करण्यासाठी कर्मचाऱ्यांच्या घरभाडे भत्ता सेवाशुल्कातून जमा होणारा निधी शासनास वापरता येऊ शकतो असे एका अधिकाऱ्याने सांगितले.
पोलिस दलातील अधिकाऱ्यांसाठी ८३ कर्मचाऱ्यांसाठी हजार ७४५ निवासस्थाने आहेत. बॉम्बे डाइंग दक्षतानगर म्हणून ओळख असलेल्या या वसाहतीत पक्के रस्ते, पथदिवे नाहीत, बहुतांश घरांच्या खिडक्यांच्या काचा तुटल्या आहेत. सांडपाणी वाहून जाण्यासाठी योग्य सोयीसुविधा नाहीत. परिसरात नियमित स्वच्छता होत नसल्याने कचऱ्याचे ढीग साचले आहेत. मुलांसाठी तयार केलेल्या उद्यानाची देखभाल दुरुस्ती नसल्याने खेळणे मोडकळीस आले असून सर्वत्र गवत झाले आहे. म्युनिसिपल कर्मचारी कॉलनीत रस्त्याच्या दुतर्फा साचलेले मातीचे ढीग.

स्वखर्चातून करून घेतो िकरकाेळ कामे
घरचीपुरुष मंडळी कामावर निघून गेल्यावर या ठिकाणी राहताना एक ना अनेक अडचणी भेडसावतात. संडास, बाथरूमला दरवाजे नाहीत, पावसाळ्यात पाणी थेट घरात शिरते, पथदिवे नसल्याने घराच्या परिसरात रात्री अंधार असतो. पक्के रस्ते नसल्याने पावसाळ्यात प्रचंड हाल होतात. खूपच गरज असली तर स्वखर्चातून किरकोळ कामे करून घेतो. अरुणाचंद्रकांत सपकाळे, बिल्डिंग नंबर 13 पोलिस कॉलनी
नऊवर्षांपासून झाली नाही रंगरंगोटी
पावसाळ्याततळघरांमध्ये पाणी शिरते. कॉलनीला सुरक्षा भिंत नाही, सांडपाणी वाहून जाण्यासाठी व्यवस्था नसल्याने कच्च्या नाल्या काढल्या आहेत. भिंतींना तडे पडले असून छत गळत राहते. मागणी करूनही देखभाल दुरुस्ती होत नाही. शेवटी अत्यावश्यक बाबींसाठी स्वत: खर्च करतो. अर्चनारवींद्र पाटील, बिल्डिंग नंबर 7, हतनूर कॉलनी
आवश्यकप्राथमिक सुविधा द्यायला हव्यात
संपूर्णशहरात सुविधा देणा-या जळगाव महापालिका कर्मचाऱ्यांच्या कॉलनीकडेच प्रशासन लक्ष देत नाही. या परिसरातील रस्ते, गटारी, सार्वजनिक शौचालय यांची प्रचंड दुरवस्था झाली आहे. घरी पाहुणे आल्यास ही महापालिका कर्मचाऱ्यांची कॉलनी नव्हे तर स्लम एरिया वाटतो. प्रशासनाने आवश्यक प्राथमिक सुविधा द्यायला हव्यात. वत्सलारमेश सोनार, मनपा कॉलनी
म्युनिसिपल कर्मचारी कॉलनीत प्राथमिक सुविधांचाही दिसून येतोय अभाव
जळगावमहापालिकेने हरिविठ्ठल रस्त्यालगत १९८० च्या सुमारास १२४ घरकुले बांधली होती. पालिका कर्मचाऱ्यांना ही घरकुले देण्यात आली आहेत. १२४ घरकुलांसाठी महिलांच्या १३ तर पुरुषांचे केवळ १२ सीटचे सार्वजनिक शौचालय आहे. कॉलनीत रस्ते नाहीत, सांडपाण्याच्या गटारी नाहीत. संपूर्ण शहरातील नागरिकांना सुविधा देण्यासाठी काम करणाऱ्या पालिका कर्मचाऱ्यांच्या कॉलन्यांमध्ये प्रचंड समस्या असल्या तरी प्रशासन यावर उपाययोजना करत नसल्याची स्थिती आहे.
तापी विकास महामंडळाच्या कॉलन्यांची दुरुस्तीअभावी माेठ्या प्रमाणात दुरवस्था
तापीविकास महामंडळाच्या हतनूर प्रकल्पासाठी कार्यरत अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी एकूण ११६ निवासस्थाने आहेत. गिरणा प्रकल्पात कार्यरत असलेल्यांसाठी २५ तर लघुपाटबंधारे प्रकल्पासाठी कार्यरत असलेल्यांसाठी १२ निवासस्थाने आहेत. यातील महाबळ रस्त्यावरील हतनूर कॉलनीत पक्के रस्ते, गटारी, पथदिवे अशा मूलभूत सुविधादेखील नाहीत. खिडक्या, दरवाजे मोडकळीस आलेले असून देखभाल दुरुस्तीअभावी स्लॅब इमारतींना तडे गेलेले आहेत.
पोलिस कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या कॉलनीचा प्रस्ताव शासनाकडे पडून
पोलिसअधीक्षक कार्यालय आवारात कालबाह्य झालेली ३०२ घरकुले पाडून तेथे अधिकाऱ्यांसाठी (टाइप- ४ची) ७८ तर कर्मचाऱ्यांसाठी (टाइप- २ची) ८६४ निवासस्थाने उभारण्याची योजना तयार केली आहे. यासाठी १८७ कोटी १६ लाख ९२ हजारांचा खर्च अपेक्षित आहे. जिल्हा पोलिस विभागातर्फे १० सप्टेंबर २०१३ रोजी पोलिस महासंचालकांच्या माध्यमातून शासनाला तसा अहवाल पाठवला होता. यानंतर पोलिस महासंचालक कार्यालयाकडून पाठपुरावा सुरू असूनही अद्याप शासनाने या संदर्भात निर्णय घेतलेला नाही.