आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नियंत्रण कक्ष स्थापन करा; अमळनेर प्रांताधिकर्‍यांच्या सूचना

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमळनेर - पावसाळ्यात अतिवृष्टी, वीज, वादळासारख्या आपत्तीपासून बचाव करण्यासाठी सर्वांनी सतर्क राहून स्वतंत्र नियंत्रण कक्ष स्थापन करून तेथे 24 तास कर्मचारी नियुक्त करण्याच्या सूचना प्रांताधिकारी तुकाराम हुलवळे यांनी दिल्या. मान्सूनपूर्व तयारीच्या बैठकीत ते बोलत होते.

तहसीलदार प्रमोद हिले यांच्या दालनात ही बैठक झाली. आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास आपणाकडे काय यंत्रणा उपलब्ध आहे? याबाबत आढावा घेण्यात आला. नदीकाठच्या गावांतील कर्मचार्‍यांनी अधिक सतर्क रहावे. सार्वजनिक बांधकाम विभागाने जेसीबी, पोकलॅँड, ट्रॅक्टर आदी यंत्रणा सज्ज ठेवावी. आरोग्य विभागातील कर्मचार्‍यांनी सतर्क रहावे, अशा सूचना देण्यात आल्या. तसेच चोपडा नगरपालिकेसाठी प्लॅन अमळनेर पालिकेने तयार ठेवावा. तापी, पांझरा, बोरी नदीकाठावरील कर्मचार्‍यांनी नियंत्रण कक्षाच्या संपर्कात रहावे, असेही सांगण्यात आले. अधिकार्‍यांनी मनोगत व्यक्त केले. या बैठकीत एपीआय अशोक पवार, नगरपालिका प्रशासन अधिकारी भाऊसाहेब देशमुख, पशुसंवर्धन विभागाचे डॉ.एस.वाय.पाटील, विस्तार अधिकारी गुलाबराव पवार, पाणीपुरवठा विभागाचे के.एल.चव्हाण, तालुका कृषी अधिकारी, आरोग्य अधिकारी, वीज वितरण कंपनीचे अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, मंडलाधिकारी आदी उपस्थित होते.