आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रुग्णाचा मृत्यू झाल्यावर संतप्त नातेवाइकांची डाॅक्टरांना मारहाण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे - येथील साक्री राेडवरील सेवा हाॅस्पिटलमध्ये जखमीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यानंतर संतप्त नातेवाइकांनी डाॅक्टरांना मारहाण केली. उपचारात दिरंगाई झाल्याचा आरोप या वेळी झाला. त्यामुळे हाॅस्पिटलमध्ये तणाव निर्माण झाला हाेता.
धुळे तालुक्यातील बाभूळवाडी येथील चतुर रघुनाथ देसले (पाटील)(वय ४०) हे रविवारी विहिरीत काम करीत असताना अंगावर दगड पडल्याने जखमी झाले. त्यांना सेवा हाॅस्पिटलमध्ये दाखल केले होते. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात दाेन दिवसांपासून उपचार सुरू होते. ते बुधवारी सकाळी शुद्धीत आले. त्यानंतर सायंकाळी सहा वाजता अचानक त्यांची प्रकृती बिघडली. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर त्यांच्या नातेवाइकांनी अतिदक्षता विभागातील डाॅक्टरांना मारहाण केली. त्यामुळे तणाव निर्माण झाला. जोपर्यंत डाॅक्टरांवर गुन्हा दाखल होत नाही ताेपर्यंत मृतदेह ताब्यात घेण्याचा पवित्रा घेण्यात आला. या वेळी दरवाजाच्या काचा फोडण्यात आल्या. या वेळी दवाखान्यातीतल काही डाॅक्टरांची नातेवाइकांच्या ताब्यातून सुटका करून त्यांना घरी पाठवले. घटनेची माहिती मिळताच शहर पाेलिस ठाण्याचे पाेलिस निरीक्षक अिनल वडनेरे, पाेलिस उपनिरीक्षक माळी दाखल झाले. त्यांनी संतप्त नातेवाइकांची समजूत काढली.अामदार कुणाल पाटील यांनी फाेनद्वारे नातेवाइकांशी चर्चा केली. या वेळी काही जण शहर पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासाठी गेले असता पाेलिसांनी तक्रार अर्ज द्यावा शवविच्छेदन अहवाल अाल्यावर गुन्हा दाखल हाेईल, असे सांगितले. त्यामुळे नातेवाइकांनी पुन्हा दवाखान्यात गाेंधळ घातला. मात्र काही जणांनी मध्यस्थी करीत नातेवाइकांची समजूत काढून त्यांना मृतदेह ताब्यात घेण्यास सांगितले.

यापूर्वीही घटना गुन्हा दाखल करावा
^डाॅक्टरांनी पैसेनसल्याने एक तास उपचार केले नाही. तब्येतीत सुधारणा हाेत असल्याचे खाेटे सांगितले. डाॅक्टरांनी दुर्लक्ष केले. त्यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही. -शैलेश देसले, पुतण्या

योग्य उपचारांना महत्त्व
देसले यांना बेशुद्ध अवस्थेत दाखल केले होते. त्यांच्यावर न्यूराे सर्जन डाॅ. श्रीकांत ब्राह्मणे यांच्यासह तीन डाॅक्टर उपचार करत हाेते. देसले शुद्धीवर आले होते. त्यांच्या प्रकृतीत सुधारणाही हाेती. त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदनानंतरच सांगता येईल. -प्रशांत पाटील, डॉक्टर
सेवा हॉस्पिटलमध्ये मृत रुग्णाच्या नातेवाइकांना समजवताना पोलिस. दुसऱ्या छायाचित्रात तोडलेला दरवाजा.