आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Seven Lac Fine Recover Bye Bhusawal Railway Police

साडेतीन लाखांचा दंड वसूल; रेल्वे सुरक्षा बलाची कामगिरी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ- धावत्या रेल्वेत चोरी, विनातिकीट प्रवास करणे, धोक्याची साखळी ओढणे, विनापरवाना खाद्य पदार्थांची विक्री करणे, आरक्षित बोगीचे तिकीट नसताना त्यातून प्रवास करणार्‍यांच्या विरोधात रेल्वे सुरक्षा बलाने कारवाई केली आहे. जानेवारी ते जून 2013 या कालावधीत 2 हजार 648 केसेस दाखल करून 3 लाख 57 हजार 305 रुपयांचा दंड वसूल केला आहे.

रेल्वे सुरक्षा बलाचे उपायुक्त के.एल.वर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली रेल्वे सुरक्षा बलाचे निरीक्षक अजय यादव यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. जानेवारी ते जून अशा सहा महिन्यांत महिलांच्या डब्यातून प्रवास करणार्‍या 1 हजार 954 प्रवाशांविरुद्ध कारवाई करून 1 लाख 95 हजार 500 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

रेल्वेस्थानकावर आणि धावत्या रेल्वेत विनापरवाना खाद्यपदार्थाची विक्री करणार्‍या 421 विक्रेत्यांकडून 96 हजार 400 रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. विनातिकीट प्रवास करणार्‍या 35 प्रवाशांविरुद्धच्या खटल्यांत 22 हजार 585, धोक्याची साखळी ओढणार्‍या 19 प्रवाशांकडून 9 हजार 870, भीक मागणार्‍या 12 तृतीयपंथीयांकडून 2 हजार 650 रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.

आरक्षण तिकिटाच्या काळाबाजाराचे तीन खटले रेल्वे न्यायालयात सुरू आहेत. प्रवाशांमध्ये दहशत निर्माण करणार्‍यांवर तीन खटले न्यायालयात सुरू आहेत. विनापरवाना खाद्यपदार्थांच्या विक्रीच्या 421 खटल्यात 96 हजार 400 रुपये, रेल्वेत व फलाटावर उपद्रव करणार्‍यांकडून 20 खटल्यांत 6 हजार 700 रुपये, रेल्वे कर्मचार्‍यांच्या कामात बाधा आणल्याच्या 6 खटल्यांत 6 हजार 100 रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.

रेल्वेरूळ क्रॉसिंगचे खटले
आरक्षित डब्यातून साधारण तिकीट असताना प्रवास करणार्‍या 71 प्रवाशांविरुद्ध दाखल खटल्यात 7 हजार 100 रुपये, नो पार्किंगमध्ये वाहने लावणार्‍यांविरुद्ध दाखल 72 खटल्यात 7 हजार 200 रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. रेल्वेरूळ ओलांडल्याच्या 30 खटल्यांत तीन हजार 300 रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.

आरपीएफ ‘दक्ष’
रेल्वेस्थानक, धावत्या गाडीत अवैध खाद्यपदार्थ विक्री करणार्‍यांवर लक्ष आहे. नियमांचे उल्लंघन करणार्‍यांविरुद्ध नियमित कारवाई होते. आरपीएफचे उपायुक्त पी.एल.वर्मा यांचे मार्गदर्शन मिळते.
-अजय यादव,निरीक्षक, आरपीएफ