आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Seven Medical College Permission Granted In Maharashtra

नंदुरबारसह राज्यात सात मेडिकल कॉलेजला मान्यता

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- नंदुरबारमध्ये मेडिकल कॉलेजसाठी मान्यतादेखील मिळाली असून, येत्या 15 दिवसांत मेडिकल कॉलेजच्या नावे जागा झाल्यानंतर 500 खाटांच्या रुग्णालयासह मेडिकल कॉलेजच्या प्रकल्पाला गती मिळू शकणार आहे. तसेच राज्यात बारामती, अलिबाग, सातारा, गोंदिया, चंद्रपूर आदी सहा अशा एकूण सात शहरांमध्ये मेडिकल कॉलेजेस साकारणार असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री विजयकुमार गावित यांनी पत्रकार परिषदेत दिली.

या मेडिकल कॉलेजेससाठी जुलै महिन्याच्या बजेटमध्ये तरतूद केली जाणार असल्याचेही त्यांनी नमूद केले. नंदुरबार वगळता राज्यातील अन्य सर्व मेडिकल कॉलेजबाबतची प्रक्रिया येत्या वर्षभरात पूर्ण करणर असल्याचे डॉ. विजयकुमार गावित यांनी सांगितले. नाशिकच्या आरोग्य विद्यापीठासाठीदेखील मेडिकल कॉलेज उपलब्ध करण्याचे आमचे प्रयत्न असल्याचेही त्यांनी नमूद केले. नाशिकमधील सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल आरोग्य विद्यापीठाकडे देण्याचा विचार होता. मात्र, ते आरोग्य विभागास हवे असल्याने ते प्रत्यक्षात होऊ शकले नसल्याचे त्यांनी नमूद केले. विद्यापीठाशी संलग्नता न लाभलेली काही कॉलेजेस विद्यार्थ्यांना प्रवेश देऊन तोंडघशी पाडतात, हे खरे असून, त्यावर कायमस्वरूपी