आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नराधम बापाची लेकीवर वाईट नजर, अल्पवयीन मुलीचा वर्षभरापासून सुरू होता लैंगिक छळ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
साधारण 15 ते 16 वर्षे वयाच्या मुलीवर 2016 पासून तिचे वडील अत्याचार करत होते. - Divya Marathi
साधारण 15 ते 16 वर्षे वयाच्या मुलीवर 2016 पासून तिचे वडील अत्याचार करत होते.
रावेर (जळगाव)- महिला दिन होऊन एक दिवस उलटत नाही तोच तरुणीवरील अत्याचाराची घटना समोर आली आहे. जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात बापानेच मुलीचा लैंगिक छळ केल्याचा प्रकार उघड झाला आहे.
 
गुरुवारी रात्री पीडित मुलीने नराधम बापाविरुद्ध निंभोरा पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दिली. स्वतःच्या मुलीवर वाईट नजर ठेवणाऱ्या नराधमला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. निंभोरा पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या विटवे गावात ही घटना घडली आहे.
 
- निंभोरा पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर पाकळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीला अटक करण्यात आले आहे. 
- आरोपी साधारण वर्षभरापासून स्वतःच्या मुलीचा (वय साधारण 15-16 वर्षे) लैंगिक छळ करत होता. 
- मुलीच्या तक्रारीवरुन पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. 
- जागतिक महिला दिनानिमीत्त महिलांचा सन्मान, त्यांना समानतेची वागणूक आणि त्यांच्या सुरक्षेबद्दल देशासह राज्यभरात परिषदा, चर्चासत्र झाले. त्याच्या दुसऱ्याच दिवशी समोर आलेल्या या घटनेने संताप व्यक्त होत आहे. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
बातम्या आणखी आहेत...