आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sexual Recording Case Inquaring By Local Crime Branch

अश्लील चित्रफीत प्रकरणाचे तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - अमळनेर येथील तरुणीच्या अश्लील चित्रफीत प्रकरणाचे वृत्त ‘दिव्य मराठी’त प्रसिद्ध झाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली आहे. तसेच या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग केला आहे. त्याचप्रमाणे गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी या प्रकरणाचा तपास गांभीर्याने करण्याचे आदेश जिल्हा पोलिस अधीक्षकांना दिले आहेत. दरम्यान, याप्रकरणी गुरुवारी सर्व महिला संघटनांच्या पदाधिकार्‍यांनी एकत्र येऊन तपासाबाबत जिल्हाधिकार्‍यांना निवेदन दिले.

अमळनेर येथील एका प्रतिष्ठित कुटुंबातील तरुणीची अश्लील चित्रफीत तयार करून ती सर्वत्र वितरित केल्याची माहिती राष्ट्रवादीच्या शहर महिला कार्यकर्त्यांनी निवेदन दिल्यानंतर पुढे आली. त्यामुळे पोलिस अधीक्षक एस. जयकुमार यांनी या प्रकरणाची दखल घेऊन संबंधित चित्रफितीची खात्री करून सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले. तसेच स्थानिक गुन्हे शाखेकडे या प्रकरणाचा तपास दिल्यावर पोलिस निरीक्षक डी. डी. गवारे यांनी गुरुवारी याबाबतची माहिती घेतली. त्यानंतर सायबर सेलला सूचना देऊन त्यासाठी स्वतंत्र पथक तयार केले. या पथकाने चौकशी केल्यावर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.

महिला पदाधिकार्‍यांचे निवेदन
जळगावातील सर्व महिला संघटनांच्या पदाधिकार्‍यांनी एकत्र येऊन पोलिस अधीक्षक एस. जयकुमार व जिल्हाधिकार्‍यांना निवेदन दिले.

तसेच या प्रकरणातील आरोपींविरुद्ध आयटी कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्याची मागणी करत चेंजिंग रूममध्ये छुपे कॅमेरे लावले आहेत काय? अशी विचारणा केली. शिष्टमंडळात जिल्हा महिला सल्लागार समितीच्या सदस्या निवेदिता ताठे, भारती म्हस्के, सरिता माळी, स्मिता वेद, वैशाली विसपुते, शोभा हंडोरे, विद्या सोनार, कल्पना पवार, अर्चना पाटील, रेखा झोपे, कला सुरवाडे यांचा समावेश होता.
गृहमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश
जिल्हा पोलिस अधीक्षक, जळगाव

या प्रकरणाची गांभीर्याने चौकशी करावी आणि त्याचा अहवाल द्यावा.
आर.आर.पाटील