आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

प्रेरणादायी संग्रहालयामुळे संदीप आजही आपल्यातच...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - २६/११च्या हल्ल्यात भारतमातेने आपला पराक्रमी आणि तितकाच उत्साही शूर पुत्र गमावला. परंतु जन्मदात्या माता-पित्यांसाठी तो अजूनही जिवंत आहे. त्यामुळेच त्याचे विचार, स्मृती जपण्यासाठी ते भारतभर फिरतात. घरात त्याचे अगदी महिन्यांपासून ते अशोक चक्रापर्यंतचे सर्व पदके यांचे त्यांनी प्रेरणादायी संग्रहालयच बनवले आहे. त्याच्याविषयी भरभरून बोलताना त्यांचा कंठ काहीसा दाटून आला, पण तो भावनेपेक्षा अभिमानानेच जास्त होता. तो वीरपुत्र म्हणजे मेजर संदीप उन्नीकृष्णन.
युवान संस्थेचे संदीप कुसळकर हे नुकतेच बंगलोरमध्ये उन्नीकृष्णन यांच्या घरी जाऊन आले. शहीद मेजर संदीप उन्नीकृष्णन यांच्या वडिलांनी २००९ मध्ये गेट वे ऑफ इंडिया ते इंडिया गेट अशी सायकल यात्रा काढली होती. त्यावेळी नगरमार्गे जाताना स्नेहालयात कुसळकर त्यांचा चांगला परिचय झाला.

कुसळकर यांना उन्नीकृष्णन दांपत्याने मुक्कामाचा आग्रह केला. यावेळी झालेल्या मनसोक्त गप्पा, सहभोजन मेजर संदीप यांच्या आठवणींना उजाळा मिळाला. उन्नीकृष्णन हे ‘इस्रो’मध्ये वैज्ञानिक होते. मिशनच्या पूर्तीसाठी रात्री-अपरात्री जेवण, रात्री घरी यायला उशीर, ही त्यांच्यासाठी नित्याची बाब होती. त्याच्या आईचाच माझ्या यशात आणि संदीपच्या जडणघडणीत मोठा वाटा असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.

देशसेवेसाठी सर्वस्व अर्पण करण्याची प्रेरणा वडिलांच्या ‘इस्रो’ मधील समर्पित कार्यातूनच संदीप उन्नीकृष्णन यांना मिळाली असावी. एनएसजी कमांडोच्या विशेष प्रशिक्षणासाठी २००६ मध्ये त्याची निवड झाली. त्याआधी १९९९ मधील कारगिल युद्धात सैनिकांची एक टीम तयार करून शत्रू सैनिकांचे जवळून निरीक्षण आणि वेळ मिळताच गोळीबार करण्यासाठी केवळ २०० मीटर अंतरावर पोस्ट तयार करण्यात त्यांनी उल्लेखनीय यश मिळवले होते.

२६/११ ला मुंबईला झालेल्या हल्ल्याच्या वेळी ते एनएसजीच्या ५१ स्पेशल अॅक्शन ग्रूपचे टीम कमांडर होते. ताज हॉटेलमधील नागरिकांना अतिरेक्यांच्या तावडीतून सोडवण्याची जबाबदारी त्यांच्याकडे आली. आपला साथीदार कमांडो सुनील यादव गंभीर जखमी झाल्यावर त्यांनी त्याला यशस्वीपणे सोडवले. रात्रभर झुंजल्यावर पहाटे पाठीवर वार झाल्याने या शूरवीराने देह सोडला. देशसेवेसाठी प्रसंगी सर्वोच्च त्यागाचे मूर्तिमंत उदाहरण आपल्या सहकार्यांसमोर ठेवले. ही प्रेरणा इतर कमांडोसाठी कामी आली.

अभिमानाने ऊर दाटला
^काही माणसेफार लवकर मोठी होतात. अशोक चक्र आणि मानपत्र दाखवताना संदीपचे वडील अभिमानाने सांगतात. जिगरबाज अधिकाऱ्याच्या जन्मदात्यांना तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या हस्ते गौरवण्यात आले. युवान संस्थेच्या राष्ट्र निर्माणच्या कार्यासाठी उन्नीकृष्णन यांनी शुभेच्छा आशीर्वाद दिले. हीच शिदोरी घेऊन मेजर संदीपच्या फोटोला एक कडक सॅल्यूट करून मी नगरला परतलो.'' संदीप कुसळकर, संस्थापक, युवान.
बातम्या आणखी आहेत...