आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहीद शशिकांत पवार यांच्या पार्थिवावर जन्मगावी अंत्यसंस्कार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे - आयटीबीटीचे शहीद जवान शशिकांत पवार यांच्या पार्थिवावर शनिवारी त्यांच्या मूळ गावी बेटावद (ता. शिंदखेडा) येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. दीड वर्षाचा मुलगा ओम, पाच वर्षांचा पुतण्या प्रणव यांनी
शहीद पवार यांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला. त्या वेळी उपस्थितांना अश्रू आवरता आले नाहीत.
उत्तराखंडमध्ये बचाव अभियान सुरू असताना मंगळवारी हेलिकॉप्टर कोसळून 20 जवान शहीद झाले. त्यात बेटावदचे शशिकांत रमेश पवार यांचाही समावेश होता. त्यांच्या पार्थिवावर शनिवारी दुपारी एक वाजता प्रियदर्शिनी विद्यालयाच्या प्रांगणात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार झाले. तत्पूर्वी सकाळी कैलासनगरमधील त्यांच्या निवासस्थानापासून फुलांनी सुशोभित केलेल्या वाहनावरून अंत्ययात्रा काढण्यात आली. बेटावदमधील व्यवहार तसेच विविध शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या. अंंत्यसंस्कारप्रसंगी केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण राज्यमंत्री माणिकराव गावित, सार्वजनिक आरोग्यमंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश शेट्टी, आमदार अनिल गोटे, आमदार प्रा. शरद पाटील, आमदार जयकुमार रावल यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.