आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shahrukh Patel Murder Case Witness Comfacing Issue

शाहरूख पटेल खून खटल्यात पंचाची साक्ष

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- मेहरूणतलावाजवळ डिसेंबर २०१३ला शाहरूख पटेल याचा खून झाल्याचे उघड झाले होते. या प्रकरणात राहुल वनिायक जोशी (नवीन जोशी काॅलनी), प्रवीण रामचंद्र पाटील (कंचननगर) हे न्यायालयीन काेठडीत आहेत.
याप्रकरणी मंगळवारी घटनास्थळाचे पंच सत्तार शेख रज्जाक शेख यांची साक्ष झाली. त्या वेळी त्याने घटनास्थळाची साधी माती, रक्तमिश्रित माती, रक्ताने माखलेला रुमाल, चप्पल, दोन चाव्या असलेले िकचेन, होकायंत्र या वस्तू दाखवण्यात आल्या. त्या सर्व वस्तू पंच शेख यांनी ओळखल्या. सरकार पक्षातर्फे अॅड. गोपाळ जळमकर, फिर्यादीतर्फे अॅड. अकील इस्माईल तर बचाव पक्षातर्फे पंकज अत्रे यांनी काम पाहिले.