आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sharad Gavit News In Marathi, Nationalist Congress, Nandurbar, Divya Marathi

राष्ट्रवादीसोबत आहे, पण आघाडीत नाही, आमदार शरद गावित यांचे स्पष्टीकरण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नंदुरबार - मी राष्ट्रवादी सोबत आहे परंतु आघाडीसोबत नाही,अशी माहिती नवापूरचे समाजवादी पक्षाचे आमदार शरद गावित यांनी पत्रकार परिषदेत दिली.कन्यादान मंगल कार्यालयाच्या सभागृहात राष्ट्रवादीची बैठक पक्ष निरीक्षक किरण शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. यानंतर घेण्यात आलेल्या पत्रपरिषदेत ते बोलत होते. राष्ट्रवादीचे गोविंदराव वसावे, विक्रांत मोरे, प्रवीण चौधरी, ईश्वर भूता पाटील आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.


आमदार शरद गावित म्हणाले, मला राज्यमंत्रीपद मिळणार की नाही हे मला माहिती नाही. माझे शरद पवारांशी कुठलेही सेटलमेंट झालेले नाही. नवापूर मतदारसंघाचा विकास व्हावा,यासाठी मी राष्ट्रवादी पक्षाचा सहयोगी सदस्य बनलो आहे. सध्या राष्ट्रवादीसोबत आहे. परंतु आघाडीसोबत नाही,अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. पवारसाहेबांनी आदेश दिल्यास आघाडीला मदत करायची किंवा नाही ते ठरवू. सध्या तरी तसे आदेश मला देण्यात आलेले नाहीत.
पक्ष निरीक्षक किरण शिंदे म्हणाले,अजित पवारांनी इशारा देऊनही डॉ. विजयकुमार गावित यांनी पक्ष विरोधी कारवाया केल्या. त्यामुळे त्यांना पक्षांतून निलंबित करण्यात आले आहे. यानंतरही कुणी पक्षाच्या विरोधात काम केले तर त्यांच्यावरही अशीच कारवाई करण्यात येईल.नंदुरबार लोकसभा मतदारसंघात आघाडी धर्माचे पालन करून धर्मनिरिपेक्ष शक्तीच्या पाठीशी उभे राहण्याचा संदेश बैठकीत देण्यात आला आहे.


दरम्यान,राष्ट्रवादीच्या बैठकीत अजूनही राष्ट्रवादीची धुरा कुणावर सोपवायची याबाबतीत निर्णय होऊ शकलेला नाही.राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष विजय चौधरी यांनी पक्ष विरोधी कारवाया केल्याने त्यांनाही पक्षातून बडतर्फ करण्यात आले आहे.परंतु त्यांच्या जागेवर अजून कुणाचीही नियुक्ती करण्यात आलेली नाही.कमलाताई मराठे यांच्याकडे जिल्हाध्यक्ष पद आहे.परंतु त्यांचे वय झाल्याने ते पक्षाची धुरा सांभाळू शकणार नाहीत.