आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्ता गेली, रयाही गेली, वाढदिवशी कार्यालयात ‘साहेब’ एकटेच

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - सत्तासुंदरीचीऐट काही आैरच असते. सत्ता असेपर्यंत पक्षातील नेते, कार्यकर्ते सदासर्वकाळ तुमचा शब्द झेलण्यासाठी तयार असतात. सत्ता जाताच हौशे,नवशे,गवशे कार्यकर्ते पाठ फिरवतात. १२ डिसेंबर हा दिवस महाराष्ट्रातील दोन लोकनेते राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि भाजपचे नेते दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचा जन्मदिवस. दरवर्षी या दोघांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये चढाओढ असायची. यंदा मात्र वेगळेच चित्र होते. शुक्रवारी राष्ट्रवादीच्या शहरातील नेते, कार्यकर्त्यांना अापल्या लाडक्या नेत्याच्या वाढदिवसाची साधी अाठवणही राहिली नाही. कार्यालयात सन्नाटा होता. कुणीतरी पवारांच्या वाढदिवसाची आठवण करून देताच कार्यकर्त्यांची धावपळ उडाली आणि रिमांड होममध्ये केक कापून साहेबांचा वाढदिवस उरकण्यात आला.
भाजप कार्यालयात मात्र वेगळे चित्र होते.मंुडे यांच्या दुर्दैवी अपघाती निधनानंतर प्रथमच त्याची जयंती होती. शहरात भाजपने मंुडेंच्या जन्मदिनी फुले वाहून त्यांना आदरांजली वाहिली.तर आकाशवाणी चौकातील राष्ट्रवादी कार्यालयात शुक्रवारी सन्नाटा होता. जिल्हाध्यक्ष आमदार डॉ.सतीश पाटील विधिमंडळ अधिवेशनासाठी नागपूरला आहेत. त्यामुळे कार्यालयातील त्यांची खुर्ची रिकामी होती. पण त्यांच्या पाठिमागे असलेली पवारांची भलीमोठी तसबीरही कार्यालयात एकटीच होती. सत्ता असताना मंत्री, पुढाऱ्यांचे येणे -जाणे सुरू असल्याने सतत कार्यकर्त्यांनी फुललेल्या कार्यालयात शुकशुकाट होता. दुपारी वाजेपर्यंत एकाही नेत्याचे पावले कार्यालयाकडे अाल्याने सन्नाटा हाेता. कार्यालयातील दाेन खाेल्यांमधील अभ्यासिकांमध्ये मात्रविद्यार्थी बसलेले हाेते.

सायंकाळी कापला केक
पवारांचावाढदिवस हा स्वाभिमान सप्ताह म्हणून साजरा केला जाताे. या अाठवडाभरात रक्तदान, अाराेग्य तपासणी शिबिर यासारखे लाेकाेपयाेगी उपक्रम राबवले जातात. हे पक्ष स्थापनेपासून सुरू अाहे. यंदाही जिल्ह्यातविविध उपक्रम राबवून वाढदिवस साजरा करण्यात आला. परंतु जळगाव शहरात एकही कार्यक्रम झाला नाही.