आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेना अामदार गुलाबरावांचे शरद पवारांनी केले सांत्वन!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - शैक्षणिक संस्था बळकावल्याच्या आरोपाखाली पोलिस कोठडीत असताना शिवसेनेचे आमदार आणि मुलूख मैदान तोफ गुलाबराव पाटील यांच्या मातोश्रींचे दोन दिवसांपूर्वी निधन झाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार हे उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या कार्यक्रमानिमित्त सोमवारी जळगावात होते. त्यामुळे त्यांनी माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे राजकीय विरोधक समजले जाणाऱ्या गुलाबरावांच्या घरी जाऊन त्यांचे सांत्वन केले. या वेळी सेना, भाजप, राष्ट्रवादी, काँग्रेस अशा सर्वच पक्षाच्या नेत्यांनी पवारांसोबत हजेरी लावली होती. पवारांनीही बसल्या, बसल्या पाऊस, पाणी, शेतीसह जळगाव जिल्ह्याची राजकीय हवाही जाणून घेतली.

जळगावातील उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील कार्यक्रम आटोपल्यानंतर दुपारी वाजेच्या सुमारास शरद पवार यांनी पाळधी (ता. धरणगाव) येथील गुलाबराव पाटील यांच्या निवासस्थानी भेट दिली. या वेळी गुलाबरावांच्या घरी अंगणात टाकलेल्या मंडपातच पवार बसले. पवारांसाठी सर्वांनी धावाधाव करून खुर्ची आणून दिली. त्यानंतर त्यांनी गुलाबरावांच्या आईविषयी विचारपूस केली. तेव्हा पटकन ईश्वरलाल जैन म्हणाले, गुलाबभाऊ आतच (तुरुंगात) होते. तेव्हाच त्यांच्या आईचे निधन झाले. जैनांच्या या विधानाने पवारांसमोर खालीच बसलेले भाजपचे आमदार हरिभाऊ जावळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे गफ्फार मलिक, अॅड. रवींद्र पाटील, आमदार सतीश पाटील यांना गालातल्या गालात का होईना, पण हसू आवरले गेले नाही. १५ मिनिटे पवार याठिकाणी थांबून होते. त्यांनी सर्वांची चौकशी करून वरवरचा आढावा घेऊन टाकला. बसल्या, बसल्या जैन यांनी जावळेंनाही गिरीश महाजन यांच्या जमिनीबाबत छेडले असता त्यांनी पटकन खुलासा केला; माझ्या नावावर कोणतीही जमीन नाही. मग आपण मंत्रिपदाची शपथ घ्यावी, अशी आमची इच्छा असल्याचे जैन यांनी सांगितले.
माझीही लावली होती फिल्डिंग : सतीश पाटील
यावेळी राष्ट्रवादीचे आमदार सतीश पाटील यांनी बोलता, बोलता पवार यांना सांगितले की, गुलाबराव पाटील यांना पोलिस आणि न्यायालयीन कोठडी भोगावी लागली. जामीन मिळाल्यामुळे ते बाहेर आले आहेत. तुमचे काय झाले? असा प्रश्न लगेच पवारांनी आमदार पाटील यांना केला. त्यावर ते म्हणाले की, मला अटकपूर्व जामीन मिळाला नाही तर माझीही फिल्डिंग लावलीच होती. पवारांना ही माहिती देत असताना पाटील यांनी आमदार हरिभाऊंनाही चिमटा काढला.
आमदार गुलाबराव पाटील यांच्या मातोश्रींचे निधन झाल्याने माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी त्यांच्या पाळधी येथील घरी भेट दिली. या वेळी खासदार ईश्वरलाल जैन, आमदार डॉ. सतीश पाटील, हरिभाऊ जावळे, गफ्फार मलिक आदी उपस्थित होते.
बातम्या आणखी आहेत...