आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sharad Pawar News In Marathi, Khandesh Vikas Aghadi, Nationalist Congress

पवार घेणार खान्देश विकास आघाडीच्या नगरसेवकांची भेट, ताणलेल्या संबंधावर चर्चा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - खाविआचे राष्ट्रवादीसोबत ताणले गेलेले संबंध पुन्हा जुळण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. त्याचाच भाग म्हणून केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्यासोबत खाविआच्या नगरसेवकांची भेट निश्चित झाली आहे. शुक्रवारी सायंकाळी जैन हिल्स येथे भेट होणार असून चर्चेनंतर पुढील भूमिका जाहीर केली जाणार आहे.


लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने सर्वच राजकीय पक्षांमधील हालचाली गतिमान झाल्या आहेत. पाठबळ मिळवण्यासाठी बोलणी सुरू झाल्या आहेत. मनपात सत्तेत असलेल्या खाविआकडूनही अशी रणनीती आखली जात आहे. खाविआचे नेते आमदार सुरेश जैन दोन वर्षांपासून कारागृहात आहेत. जैन यांच्या अडचणी दूर करण्यासाठी खाविआतर्फे प्रय} सुरू आहेत. वरिष्ठ पातळीवर मदत करणार्‍या पक्षाला लोकसभेत मदत करण्याची भूमिका व्यक्त केली जात आहे. यासंदर्भात ठोस निर्णय न झाल्यास दोन्ही जागा लढवण्याची तयारी सुरू केली असून हा एकप्रकारे दबाव तंत्राचा भाग मानला जात आहे. यासंदर्भात केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या सोबत चर्चा करण्यासाठी जैन हिल्स येथे वेळ निश्चित करण्यात आली आहे. या वेळी महापालिकेतील विकासकामांसाठी निधीची मागणी तसेच आमदार जैन यांच्यासंदर्भात मदतीचा हात मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जाणार आहे. चर्चेदरम्यान पवारांकडून काय आश्वासन दिले जाते, यावर पुढील राजकीय समिकरणे अवलंबून राहणार आहेत.


कृषिमंत्र्यांचा दौरा
केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार शुक्रवारी जिल्हा दौर्‍यावर येत आहेत. दुपारी 12 वाजता हेलिकॉप्टरने ते पारोळा येथे येणार आहेत. कार्यकर्त्याच्या भेटीनंतर दुपारी 2 वाजता पारोळा येथे जाहीर सभेला ते उपस्थित राहतील. दुपारी 4 वाजता चोपड्यात ते जाहीर सभा घेणार आहेत. सायंकाळी 6 वाजता ते जळगाव येथे येणार आहेत. राष्ट्रवादीच्या कार्यालयात रात्री 9 वाजेपर्यंत पदाधिकार्‍यांच्या भेटी आणि कार्यकर्त्यांच्या बैठकीला हजेरी लावतील. रात्री जैन हिल्स येथे ते मुक्कामी राहणार असून शनिवारी सकाळी अकोला येथे जाणार आहेत.