आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sharad Pawar News In Marathi, NCP, Divya Marathi, Lok Sabha Election

शरद पवार आज जिल्ह्यात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार गुरुवारी जिल्हा दौर्‍यावर येत आहेत. दौर्‍यात दुपारी 1.30 वाजता चाळीसगाव, सायंकाळी 5 वाजता रावेर, 7 वाजता जळगाव येथे सागर पार्कवर त्यांची जाहीर सभा होईल. रात्री ते जैन हिल्स येथे मुक्कामी राहणार आहेत. दोन्ही मतदारसंघातील पक्षातील नाराज गट, प्रमुख पदाधिकारी, जुने स्नेही, विरोधी पक्षातील काठावरचे पदाधिकारी, सामाजिक पदाधिकारी यांच्याशी प्रत्यक्ष चर्चा करण्याचे नियोजन त्यांच्या दौर्‍याचा प्रमुख उद्देश आहे.
कार्यकर्त्यांची पळवापळवी
प्रचारासाठी भुसावळात राष्ट्रवादीची दोन कार्यालये थाटली गेली. त्यानंतर आता प्रचारासाठी कार्यकर्त्यांची पळवापळवी सुरू झाली आहे. अनिल चौधरी आणि संजय सावकारे यापैकी कोणत्या गटातून राष्ट्रवादीचा प्रचार करावा, असे धर्मसंकट कार्यकर्त्यांसमोर उभे राहिले आहे. शरद पवार यांच्या गुरुवारच्या दौर्‍यावरही गटबाजीचे सावट कायम राहण्याची चिन्हे आहेत.