आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पैशांसाठी होणारा छळ नाकारून तिने सिद्ध केले स्वत:ला!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - सरकारी नोकरीत असूनही पत्नीच्या माहेरहून पैशांची अपेक्षा करणार्‍या पती आणि त्याच्या आई-वडिलांना दूर सारत तिने आज स्वत:ला सिद्ध केले आहे. सुवर्णा पांडुरंग महाजन ही पारोळा गावची मुलगी झाशीच्या राणीला आदर्श मानणारी! आपल्यापेक्षा लहान असलेल्या तिन्ही बहिणींच्या लग्नासाठी पैशांची चिंता करणार्‍या आई-वडिलांना आपल्या पतीची पैशांची भूक भागवणे शक्य होणार नाही आणि त्यासाठी छळ सहन करणेही शक्य नाही, असा विचार करत तिने पतीशी कायदेशीर फारकत घेतली. आज ती पीएसआय झाली. दोन आठवड्यांपूर्वी म्हणजे 11 जुलैला सुवर्णाचा पुनर्विवाह झाला असून, तिचे पती बॅँकेत लेखापरीक्षक आहेत. जिद्द आणि आत्मविश्वासाच्या बळावर तिने जाचातून सुटका करून घेत भविष्य घडवलं आहे!