आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिल्पा भोईटेंच्या कोठडीत एक दिवसाने वाढ

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - उत्पन्नापेक्षा अधिक संपत्ती बाळगल्याप्रकरणी अटकेत असलेले वीरेंद्र भोईटे यांच्या पत्नी शिल्पा भोईटे यांच्या पोलिस कोठडीची मुदत संपल्यामुळे त्यांना बुधवारी न्यायालयात हजर केले होते. या वेळी त्यांच्या कोठडीत पुन्हा एक दिवसाने वाढ करण्यात आली.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने भोईटे यांच्या निवासस्थानी ज्या दिवशी छापा घातला त्याच दिवशी शिल्पा यांनी त्यांच्या लॉकरची हाताळणी केली होती. ही बाब चौकशीत पुढे आल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांना अटक केली होती. दरम्यान ज्या दिवशी त्यांनी लॉकरची हाताळणी केली. त्या दिवसाचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी मिळविले आहे. त्यात शिल्पा यांच्यासोबत एक तरुणी व त्यांच्या हातात एक पिशवी असल्याचे दिसत असल्याने ती पिशवी कशाची होती व ती मुलगी कोण याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी कोठडीची मागणी केली होती. ही मागणी न्यायालयाने मान्य करीत त्यांच्या पोलीस कोठडीत एका दिवसाने वाढ केली आहे.