आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिरपूर-बडाेदा बसला भीषण अपघात; 7 ठार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे/शिरपूर/तळाेदा - शिरपूर अागाराच्या शिरपूर-बडाेदा बसला रविवारी रात्री दहा ते अकरा वाजेच्या सुमारास अंकलेश्वर महामार्गावरील नेत्रम फाट्याजवळ समाेरून येणाऱ्या ट्रकने जाेरदार धडक दिली. या अपघातात बसचा जवळपास अर्धा भाग कापला गेला हाेता. त्यात सात जण ठार झाले अाहेत. त्यात शिरपूर तालुक्यातील तिघे अाहेत.
शिरपूर अागाराची बस (एमएच २०-बीएल २६९४) रविवारी सायंकाळी वाजता शिरपूर अागारातून बडाेद्यासाठी निघाली. अक्कलकुवामार्गे बस गुजरातमध्ये जात असताना गुजरात सीमेलगत असलेल्या डेडियापाडा नेत्रम गावादरम्यान रात्री दहा ते अकरा वाजेच्या सुमारास समाेरून येणाऱ्या ट्रक (जीजे ११-झेड ७७७१)ने बसला जाेरदार धडक दिली. रात्रीची वेळ असल्याने अनेक प्रवासी झाेपेच्या गुंगीत असल्याने नेमके काय झाले हे समजण्यापूर्वीच चालकाकडील बाजू सहा सीटपर्यंत कापली गेली हाेती. तसेच दर्शनी भागाचाही पूर्णपणे चेंदामेंदा झाला हाेता. ट्रकमध्ये अवजड वस्तू असल्याने बस पूर्णपणे कापली गेली. त्यात चार जणांचा जागीच मृत्यू झाला.बसमध्ये अडकलेले मृतदेह काढण्यासाठी पत्रा कापावा लागला. या अपघातात बस चालक विशाल निकम (३१) याचा जागीच मृत्यू झाला. ताे बाेराडी येथील रहिवासी अाहे.

अपघातातील मृत
कपिल प्रभाकर सूर्यवंशी (२९, रा. तळोदा, हल्ल मुक्काम अंकलेश्वर), जसूबेन जुदाभाई खिंदव (भरवाड, जि. सुरेंद्रनगर), किरीट इंद्रप्रभात भट (५२, बडोदा), गांदूभाई अमाभाई भरवाड ( ६०, मोरवी, गुजरात), नाना सखाराम पाटील (६५, थाळनेर ता. शिरपूर) विशाल निकम तर ट्रकचा सहचालक बिजाजखान जुबेरखान पठाण (शिरपूर) हे सात जण ठार झाले अाहेत.