आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shiv Sena 50 Thousand Signatures Campaign From Tomorrow

शिवसेनेतर्फे उद्यापासून ५० हजार सह्यांची मोहीम, एकमताने निर्णय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- बाळासाहेब ठाकरे यांना अपेक्षित असलेले हिंदुराष्ट्र घोषित करावे, स्वातंत्र्यवीर सावरकर यांना "भारतरत्न' प्रदान करून बाळासाहेबांना श्रद्धांजली द्यावी, या मागण्यांसाठी मंगळवारी सकाळी ९.३० वाजेपासून महानगर शिवसेनेतर्फे शहरात सह्यांची मोहीम राबवण्यात येणार आहे. किमान ५० हजार सह्यांचे पत्र सरकारकडे पाठवण्यात येणार असल्याचा निर्णय शिवसेना महानगराच्या बैठकीत घेतला.

बाळासाहेब ठाकरे यांच्या तिसऱ्या स्मृतिदिनानिमित्त शिवसेना महानगरची बैठक रविवारी शिवसेना कार्यालयात झाली. बैठकीला माजी जिल्हाप्रमुख गणेश राणा, उपजिल्हाप्रमुख चिंतामण जैतकर, महानगरप्रमुख गणेश सोनवणे, कुलभूषण पाटील, माजी महानगरप्रमुख गजानन मालपुरे, मंगला बारी, शोभा चौधरी अादी उपस्थित होते.

शिवसेना महिला आघाडीतर्फे प्रकल्पप्रमुख मंगला बारी यांच्या नेतृत्वात अंध महिलांना स्वेटरवाटप करण्यात येणार आहे. मंगळवारी सकाळी ११ ते दुपारी वाजेदरम्यान शिवसेना महानगर कार्यालय तसेच जिल्हा रुग्णालय येथे फळवाटप करण्यात येणार आहेत. सायंकाळी वाजता रेल्वे स्थानकाजवळ प्रकल्पप्रमुख प्रकाश बेदमुथा कपिल लढ्ढा यांच्या पुढाकाराने रात्री वाजता चादरींचे वाटप करण्यात येणार आहे. युवा सेनेच्या वतीने प्रतिमापूजन वृक्षारोपण, कपडेवाटपाचा कार्यक्रम महाविद्यालयस्तरावर घेण्यात येणार आहे. या उपक्रमाचे विनायक कोळी हे आयोजक आहेत.