आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहर वाहतूक पोलिसांशी हुज्जत घालणाऱ्या शिवसैनिकाला दंड

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- जिल्हा क्रीडा संकुलाजवळ सोमवारी दुपारी वाजता एक शविसैनिक मोबाइलवर बोलत दुचाकी चालवत होता. त्याला वाहतूक पोलिसांनी हटकले असता, त्याने पोलिसांशी हुज्जत घालून शविीगाळ केली. त्यानंतर शहर वाहतूक पोलिस निरीक्षक चंद्रकांत सरोदे यांनी त्याला ताब्यात घेऊन दंड ठोठावला.
क्रीडा संकुलासमोर विनोद सहादू मराठे (रा.हरी विठ्ठलनगर) हा त्याच्या दुचाकीने (एमएच १९ बीझेड १६६६) माेबाइलवर बाेलत कोर्ट चौकाकडे जात होता. त्या वेळी क्रीडा संकुलाच्या सिग्नलजवळ कर्तव्यावर असणारे वाहतूक पोलिस प्रकाश पाटील यांनी विनोदला अडवले. त्याने हुज्जत घालण्यास सुरुवात केली. त्याच्याजवळ वाहन चालवण्याचा परवानाही नव्हता. पाटील यांनी त्यांच्यासोबत असणाऱ्या महिला वाहतूक पोलिस शीतल भालेराव यांना मेमो फाडण्यास सांगितले. यावर विनोद याने मी शविसैनिक आहे. माझे तुम्ही काहीच करू शकत नाही, या अविर्भावात पोलिसांना धमकी दिली. तसेच त्याने त्याच्या काही मित्रांना बोलावले. त्यांनीही पोलिसांशी हुज्जत घातली. या वेळी पोलिस निरीक्षक सरोदे घटनास्थळावर आले. त्यांनी विनोदला ताब्यात घेऊन शहर वाहतूक कार्यालयात घेऊन जाऊन ४०० रुपयांचा दंड ठोठावून समज दिली.

जळगाव सिग्नलतोडणाऱ्या मद्यधुंद तीन तरुणांनी वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलिसांशी हुज्जत घातली. या तिघांना समजवण्यासाठी आलेल्या तरुणालाही मारहाण केल्याची घटना कोर्ट चौकात सोमवारी सायंकाळी ६.३० वाजता घडली. यातील दोघे फरार झाले असून एकास ताब्यात घेण्यात आले आहे.
कोर्ट चौकात वाहतूक पोलिस आर. आर. सोनवणे मुक्तार पठाण कर्तव्यावर होते. या वेळी नेहरू चोकाकडून स्वातंत्र्य चौकाकडे मद्यधुंद अवस्थेतील तिघे तरुण होंडा शाइन गाडीवर (एमएच २८ एएच ४२७८) भरधाव वेगाने जात होते. त्यांनी कोर्ट चौकातील सिग्नल तोडल्याने त्यांना सोनवणे यांनी अडवले.
तिघांनी साेनवणे पठाण यांना शविीगाळ केली. त्यांना समजवण्यासाठी गोपाल सपकाळे (वय २१, रा.आव्हाणे) गेला असता, त्यालाही बेदम मारहाण केली; तर दोघा पोलिसांच्या अंगावर धावून दगड उगारला. यामुळे उपस्थित नागरिकांनी तिघा तरुणांच्या दशिेने धाव घेतल्याने दोघांनी घटनास्थळावरून पळ काढला, तर दुचाकीचालक ललित लीलाधर बऱ्हाटे (वय २३, रा.नांदेड, साळवा, ता.धरणगाव) याला ताब्यात घेऊन शहर पोलिस ठाण्यात नेले. याप्रकरणी गाेपाल सपकाळे याने दिलेल्या फिर्यादीवरून ललितसह तिघांवर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर ललित याला वाहतूक पोलिस कार्यालयात नेऊन त्याच्यावर मद्य पिऊन वाहन चालवल्याप्रकरणी कारवाई केली.
बातम्या आणखी आहेत...