आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मद्यधुंद तरुण-तरुणींना शिवसैनिकांचा झटका

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - महामार्गावरील ढाब्यावर मद्यधुंद होऊन आक्षेपार्ह चाळे करणाऱ्या तरुण-तरुणींना शिवसैनिकांनी झटका दिल्याची घटना शनिवारी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास पाळधीजवळ घडली. बांभोरी ते पाळधी दरम्यान असलेल्या ढाब्यांवर परिसरातील महाविद्यालयीन विद्यार्थी विद्यार्थिनी रात्री जेवणासाठी येतात. शनिवारी रात्री ९.३० वाजता मद्यधुंद झालेल्या महाविद्यालयीन विद्यार्थी विद्यार्थिनींनी ढाब्यावरच आक्षेपार्ह चाळे करण्यास सुरुवात केली. या वेळी पाळधी येथून जळगावकडे येणाऱ्या शिवसैनिकांना हा प्रकार लक्षात आल्याने त्यांनी ढाबामालकाला हटकले. यासंदर्भात शिवसैनिकांनी जाब विचारला असता, व्यवसाय असल्याने कोणास प्रतिबंध करू शकत नाही, असे ढाबा चालकाने उत्तर दिले. या वेळी दोघांमध्ये झालेल्या शाब्दिक चकमकीमुळे नशा उतरलेल्या विद्यार्थी विद्यार्थिनींनी ढाब्यावरून पळ काढला.