आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shiv Sena Candidate Suresh Jain,latest News In Divya Marathi

विविध भागात प्रचारफे-या

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- मंगळवारीविविध भागात शिवसेनेचे उमेदवार सुरेश जैन यांच्या प्रचारफेऱ्या काढण्यात आल्या. समतानगर, संभाजीनगर, आदर्शनगर ते नवीपेठ, दाणाबाजार, सराफ बाजार, बालाजीपेठ, नित्यानंदनगर, सेल्स टॅक्स ऑफिसमार्गे समर्थ सोसायटी, वृंदावन गार्डन, शारदा शाळेजवळून समर्थ मंदिराजवळ प्रचारफेऱ्यांचा समारोप करण्यात आला. फे-यांमध्ये रमेश जैन, जयश्री धांडे, वर्षा खडके आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले होते. तसेच प्रभाग क्रमांक 1,3 मध्ये मनसेचे उमेदवार ललित कोल्हे यांची प्रचारफेऱ्या काढण्यात आल्या. सकाळी शिवाजीनगर, हुडको, सागरमल हायस्कूल, गेंदालाल मिल, लक्ष्मीनगर, दुपारी पिंप्राळा परिसर, दांडेकरनगर, मानराज पार्क, विद्यानगर, मढी चौक, धनगरवाडा, कोळीवाडा, शंकर आप्पानगर, शिंदेनगर या परिसरात फे-या काढण्यात आल्‍या त्यात अनंत जोशी, सुनील पाटील, जहांगीर खान, सुधीर कोकाटे, स्वामी पोतदार आदींसह कार्यकर्त्यांचा सहभाग होती.