आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेनेचे मोहन तिवारी यांना हद्दपारीची नोटीस

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - शिवसेना उपमहानगरप्रमुख मोहन तिवारी यांना दोन वर्षांकरता हद्दपार करण्याची नोटीस बजावली आहे. या संदर्भात १० एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता सुनावणीसाठी हजर राहण्याचे आदेश उपविभागीय दंडाधिका-यांनी दिले आहेत. जळगाव, धुळे, नाशिक आणि बुलडाणा अशा चार जिल्ह्यांतून हद्दपारीचा यात उल्लेख आहे.

शिवसेना महानगर प्रमुख गजानन मालपुरे यांच्यावर हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे. त्या पाठोपाठ उप महानगरप्रमुख तिवारी यांना ‘हद्दपार का करू नये’ अशा आशयाची नोटीस बजावली आहे. वेळोवेळी केलेल्या आंदोलनांमुळे त्यांच्यावर २००८ ते २०११ या कालावधीत जळगाव शहर ठाण्याच्या आवारात आठ गुन्हे दाखल आहेत. तर जिल्हापेठ ठाणे आवारात एक गुन्हा दाखल आहे. त्यामुळे दोन वर्षांकरता तुम्हाला जळगाव, धुळे, नाशिक, बुलढाणा अशा चार जिल्ह्यांतून हद्दपार का करण्यात येवू नये, असे नाेटीसमध्ये म्हटले आहे. राजकीय हेतूने प्रेरीत ही नाेटीस असून वेळ पडल्यास न्यायालयात जाण्याची तयारी असल्याचे तिवारी यांनी सांगितले.