आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shiv Sena Leaders Anger Due To Compromise Politics

जिल्ह्यातील नेत्यांच्या तडजोड धोरणामुळे शिवसैनिकांचा संताप

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - शिवसेनेच्या नेत्यांना जिल्हा दूध संघावरील तज्ज्ञ संचालकपदी आणि जळगाव बाजार समितीमध्ये प्रथमच सभापतिपदाची संधी मिळाली नाही. ही बाब नेत्यांसाठी अवघड जागेचे दुखणे बनले आहे. मात्र, भाजप नेत्यांनी मुद्दामपणे खेळी खेळल्याची भावना शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे.

जळगाव बाजार समितीचे सभापतिपद पहिल्यांदा शिवसेनेला मिळावे म्हणून कार्यकर्त्यांनी नेत्यांकडे आग्रह धरला होता. मात्र, सर्वपक्षीयच्या फॉर्म्युल्यात शिवसेनेकडे कोणतेच अधिकार नसल्याने शिवसेनेच्या नेत्यांना भाजपच्या इशाऱ्यावर चालावे लागत आहे. दूध संघाच्या निवडणुकीत खुद्द आमदार गुलाबराव पाटील हे यावल तालुक्यातून निवडणुकीच्या रिंगणात उभे होते. मात्र, त्यांना तज्ज्ञ संचालक म्हणून दूध संघावर घेण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, त्यांच्या नियुक्तीची शक्यता असताना खासदार ए. टी. पाटील यांची वर्णी लागली. त्यामुळे शिवसेनेत भाजपविरोधात नाराजीची लाट निर्माण झाली आहे.

‘सर्वपक्षीय’ प्रयोग शिवसेनेच्या अंगलट
जिल्ह्यातसर्वपक्षीय निवडणुकीचे प्रयोग आता संबंधित नेत्यांच्या अंगलट येत आहेत. नेत्यांनी परिस्थिती डोळ्यासमोर ठेवून राजकीय तडजोड केल्या असल्या तरी त्याचे परिणाम आगामी निवडणुकींमध्ये दिसणार आहेत. यात सर्वाधिक नुकसान शिवसेनेचे होऊ शकते. सेनेच्या नेत्यांच्या सर्वपक्षीयचा झटका बसण्याची शक्यता सेनेतील अलिप्त असलेल्या गटाच्या नेत्यांमधून पुढे येत आहेत.

नेते विरुद्ध कार्यकर्ते
शिवसेनेतसध्या नेते विरुद्ध कार्यकर्ते, असा अंतर्गत संघर्ष सुरू आहे. कार्यकर्ते स्थानिक पातळीवर भाजपच्या कार्यकर्त्यांशी लढत असताना नेते मात्र भाजपसोबत जुळवून घेत आहेत. शिवसेनेच्या महानगर पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्र्यांविरुद्ध घेतलेल्या पत्रकार परिषदेसंदर्भात खुद्द आमदारांनी त्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा पक्षाशी संबंध नसल्याचा दावा केला होता. या प्रकारामुळे दुसऱ्या फळीतील पदाधिकारी आणि कार्यकर्ते सध्या शिवसेनेच्या जिल्ह्यातील नेत्यांविषयी नाराज आहेत.