आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेनेच्या ज्योत्स्ना मुंदडांचा राजीनामा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे - भाजपपाठोपाठ शिवसेनेच्या महिला शाखेला धक्का बसला आहे. जिल्हा महिला संघटक ज्योत्स्ना मुंदडा यांनी राजीनामा दिला.

शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांना पाठवलेल्या राजीनामा पत्रात ज्योत्स्ना मुंदडा यांनी म्हटले आहे की, पाच वर्षांत महिला कार्यकर्त्यांनी आंदोलने केली ; परंतु महापालिका निवडणुकीत शिवसेनेला पाहिजे तसे यश मिळाले नाही. जिल्हा संघटक म्हणून काम करताना बाळासाहेब ठाकरे यांच्या शिकवणीनुसार 80 टक्के समाजकारण आणि 20 राजकारण या पद्धतीने काम केले ; पण हे केवळ बोलण्यापुरते बरे वाटते. कारण सर्वत्र अर्थकारणच चालते. पैशांचे राजकारण चालते. याचे जिवंत उदाहरण महापालिकेचे निकाल ठरले आहेत. जनता मात्र शेवटच्या क्षणी पैशांच्या आमिषाला बळी पडते. त्यामुळे काम करणार्‍या व्यक्तीला नैराश्य येते. त्यामुळे ही जबाबदारी परिस्थितीनुसार पेलण्याची मानसिकता नाही. त्यामुळे महिला आघाडी जिल्हा संघटकपदाचा राजीनामा देत असल्याचे म्हटले आहे. या राजीनाम्याची प्रत जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे यांनाही देण्यात आल्याची माहिती सौ. मुंदडा यांनी दिली आहे.