आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुरेश जैन शिवसेनेत सक्रिय , शहरात शिवसेनेच्या सदस्य नाेंदणीचा शुभारंभ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - दाेन दिवसांपूर्वीच बाहेरगावाहून जळगावात दाखल झालेले माजी अामदार सुरेश जैन शिवसेनेत सक्रिय झाले अाहेत. साेमवारी पक्षाच्या सदस्य नाेंदणीचा शुभारंभ जैन यांच्यापासून करण्यात अाला. अर्जावर स्वाक्षरी करून जैन पक्षाचे सक्रिय सदस्य झाले अाहेत.
घरकुल घाेटाळ्यात गेल्या साडेचार वर्षांपासून कारागृहात असलेल्या माजी अामदार सुरेश जैन यांना गेल्या महिन्यात जामीन मंजूर झाल्यानंतर ते जळगावात दाखल झाले हाेते. त्यानंतर काही दिवसांतच राजस्थान त्यानंतर मंुबईत थांबून हाेते. त्यामुळे त्यांच्या राजकीय वाटचालीसंदर्भात तर्कवितर्क काढले जात हाेते. गेल्या दाेन दिवसांपूर्वीच जैन हे जळगावात दाखल झाले अाहेत. शिवसेनेची गेल्या काही दिवसांपासून प्रलंबित असलेली सदस्य नाेंदणीचा शुभारंभ जैन यांच्या हस्ते पहिला अर्ज भरून करण्यात अाली. शिवसेना पक्षाच्या वतीने त्यांना सक्रिय करण्याचा प्रयत्न हाेताना दिसत अाहे.

अांदाेलन ठोस भूमिकांमुळे सतत चर्चेत असलेल्या शिवसेनेत गेल्या काही दिवसांपासून मरगळ अाल्याची टीका हाेऊ लागली हाेती. नेत्यांकडून कार्यकर्त्यांचे कान उपटण्याचे प्रकारही सुरू झाले हाेते. त्यानंतर शिवसेनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांमध्ये पुन्हा उत्साह अाणण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू झाले अाहेत. इतर तालुक्यांच्या तुलनेत मागे पडलेल्या जळगाव शहरातील सदस्य नाेंदणीचा मुहूर्त सोमवारी काढण्यात अाला.

माजी अामदार सुरेश जैन यांच्या उपस्थितीत त्यांच्या स्वाक्षरीने सदस्य नाेंदणीला सुरुवात झाल्यानंतर मात्र शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. सदस्य नाेंदणीवेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख चिंतामण जैतकर, महानगरप्रमुख कुलभूषण पाटील, गणेश साेनवणे, नगरसेवक जितेंद्र मुंदडा, समन्वयक किशोर भोसले, दिनेश जगताप, हेमंत महाजन, साेहम विसपुते, मानसिंग साेनवणेे, शांताराम सूर्यवंशी, मंगला बारी यांच्यासह शेकडाे शिवसैनिकांची उपस्थिती हाेती.

७५ शाखांना प्रत्येकी १००० सदस्य नोंदणीचे टार्गेट
मंगळवारपासून शिवसेनेच्या शहरातील ७५ शाखांच्या शाखाप्रमुखांना प्रत्येकी हजार सदस्य अर्ज देण्यात येणार अाहेत. त्यानंतर उपशहरप्रमुख विभागप्रमुखांवर जबाबदारी सोपवण्यात येणार अाहे. दाेन आठवड्यांत शहरातील संपूर्ण सदस्य नाेंदणी पूर्ण करण्यात येणार अाहे. यंदा शहरातून एक लाखाचे टार्गेट निश्चित करण्यात अाले अाहे. वाॅर्ड तिथे शाखा, घर तिथे शिवसैनिक या हेतूने वाॅर्डा-वाॅर्डात सदस्य नाेंदणी करण्यात येणार असल्याची माहिती कुलभूषण पाटील यांनी दिली.
शिवसेना सदस्य नोंदणी मोहिमेचा शुभारंभ अर्ज भरून करताना माजी आमदार सुरेश जैन.
बातम्या आणखी आहेत...