आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापालिका अधिका-यांचा आमदाराला थर्ड! क्रॉम्प्टन कार्यालयात राडा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- परीक्षा काळात रात्रीचे भारनियमन बंद करा, शहरासह तालुक्यातील वीजपुरवठा सुरळीत करा अादी मागण्यांसाठी शिवसेनेने अामदार गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी दुपारी क्राॅम्प्टन कंपनीच्या कार्यालयासमाेर अांदाेलन करून संबंिधतांना चांगलेच धारेवर धरले. तसेच शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी क्राॅम्प्टनचे युनिट हेड भवानीप्रसाद राव यांना कार्यालयातून खेचून बाहेर अाणून कार्यालयाला कुलूप ठाेकण्याचा प्रयत्न केला. अखेर पाेलिसांची मध्यस्थी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी झालेल्या चर्चेनंतर अधिकाऱ्यांनी तूर्त १६ फेब्रुवारीपर्यंत भारनियमन बंद ठेवण्याचे अाश्वासन िदले. त्यामुळे अांदाेलन मागे घेतले.
‘काहीही अधिकार नसतील तर तुम्ही खुर्ची सोडा आम्ही कार्यालयाला कुलूप ठोकतो’ अशी भूमिका अामदार पाटील यांनी या वेळी घेतली. वीज बंद असताना िदले जाणारे बिल, नादुरुस्त ट्रान्सफाॅर्मर यासह कंपनीच्या अभियंत्यांच्या अरेरावीविरोधात आमदार पाटील यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. चार दिवसांपूर्वी याबाबत माहिती देऊनही कुठलाही निर्णय घेतल्याने संतप्त झालेले आमदार पाटील यांनी अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले. यासह जमलेल्या शेतकरी ग्राहकांनीही अधिकाऱ्यांचा एकेरी शब्दात उल्लेख करीत समाधानकारक आश्वासन मिळाल्याशिवाय जागेवरून उठण्याचा पवित्रा घेतला. तसेच महिला कार्यकर्त्यांनी बांगड्याचा अहेर देण्याचा प्रयत्न केला. तालुक्यातील आव्हाणे, कानळदा, आसोदा, भादली, ममुराबाद यासह अनेक गावांतील शेतकऱ्यांनी या वेळी संताप व्यक्त केला. दरम्यान, महावितरणचे मुख्य अभियंता प्रसाद रेशमे यांच्या संपर्कानंतर राव यांनी १६ तारखेपर्यंत भारनियमन रद्द करण्याचे आश्वासन दिले.
नवीपेठेत ४८ तास वीज गूल
मंगळवारीवादळामुळे नवीपेठेत शारदा प्रकाशनच्या मागील गल्लीतील साठ वर्षांपेक्षा अधिक जुने चिंचाचे झाड पडल्याने खंडित झालेला वीजपुरवठा ४८ तास उलटूनही पूर्ववत झालेला नव्हता.
16 फेब्रुवारीपर्यंत भारनियमन रद्द
तासभरथांबूनही युनिट हेड राव यांनी कुठलाही निर्णय घेतल्याने आंदोलकांनी कार्यालय खाली करून कुलूप ठोकण्याचा िनर्णय घेतला. राव यांना महिला कार्यकर्त्यांनी एकेरी भाषा वापरत कार्यालयाबाहेर काढले. तसेच कर्मचाऱ्यांनाही कार्यालय खाली करण्यास भाग पाडले.
शिंगाडे मोर्चा काढणार
चारदिवसांत भारनियमन झाल्यास परीक्षा काळात ते पूर्णपणे थांबवण्याच्या मागणीसाठी बुधवारी पुन्हा शिंगाडे मोर्चा काढण्याचा इशारा या वेळी अामदार गुलाबराव पाटील यांनी दिला. हे आंदोलन यापेक्षा तीव्र असेल. माजी सभापती राजेंद्र चव्हाण, रावसाहेब पाटील, शोभा चौधरी, श्रावण ताडे, धोंडू जगताप, जितेंद्र पोळ, श्यामकांत जाधव यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले.
शेतकरी करणार नुकसानभरपाईचा दावा-
पावसानेशेतक-यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. कंपनीकडून मात्र आपलेच नुकसान झाल्याचा दावा केला जात आहे. त्यातच परीक्षेचा काळ सुरू असताना सायंकाळी ते रात्री या वेळेत भारनियमन सुरू आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमधून प्रचंड संताप व्यक्त होत असताना वीज कंपनीचे अधिकारी मात्र एसीत बसून नागरिकांना फिरवत असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले. शेतकऱ्यांनी दोन लाखांच्या नुकसानभरपाईचा दावा दाखल करण्याचे अावाहनही केले. शेतकरी विजेचे बिल भरत असतानाही त्यांना पुरेशी वीज मिळत नाही. किमान परीक्षेच्या काळात तरी भारनियमन करण्याची अाग्रही मागणी करण्यात आली. मात्र, हा निर्णय आपला नसल्याचे सांगत अधिकाऱ्यांनी हात वर केले. त्यामुळे संतप्त झालेल्या आमदार पाटील यांनी हा प्रश्न तुमचा आहे. तो तुम्ही सोडवा, अन्यथा परिणामांना सामोरे जा, असा दमच अधिकाऱ्यांना दिला. दरम्यान, यावरून सहायक पोलिस निरीक्षक सुनीता गवळी यांच्याशीही कार्यकर्त्यांचा शाब्दिक वाद झाला.