आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेनेचे आमदार गुलाबराव पाटलांची शरणागती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- म्हसावद येथील पद्मालय शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेत बनावट कागदपत्रे सादर करून सभासद केल्याने तसेच प्रोसिडिंगवर मृत सभासदाच्या स्वाक्षरी केल्याप्रकरणी शिवसेनेचे उपनेते अामदार गुलाबराव पाटील यांच्यासह सहा जणांवर गुन्हा दाखल अाहे. याप्रकरणी अाैरंगाबाद खंडपीठाने अामदार पाटील यांचा १३ जून राेजी अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्याने ते गुरुवारी सकाळी ११ वाजता न्यायालयाला शरण अाले. त्यांना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी दिवसाची पाेलिस काेठडी सुनावली.

पद्मालय शिक्षण प्रसारक मंडळात, फसवणूक गैरव्यवहार केल्याप्रकरणी सन २०११ मध्ये एमअायडीसी पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात अाला हाेता. त्या गुन्ह्याचे दाेषाराेपपत्र २०१५ मध्ये न्यायालयात सादर करण्यात अाले. पाच संशयितांना यापूर्वीच अटकपूर्व जामीन मिळाला अाहे.

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)