आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आमदार गुलाबराव पाटील यांना सशर्त जामीन; अाईचा आज अंत्यविधी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- म्हसावद येथील शैक्षणिक संस्थेत बनावट कागदपत्रे सादर केल्याप्रकरणातील संशयित आरोपी आमदार गुलाबराव पाटील यांना शनिवारी न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला. यात त्यांना महिन्याच्या पहिल्या शनिवारी पोलिसांत हजेरी लावावी लागणार आहे.

म्हसावद येथील पद्मालय शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेत मृत सभासदाच्या नावाने बनावट स्वाक्षरी करून संस्थेची फसवणूक तसेच गैरव्यवहार केल्याप्रकरणी पाटील यांचा जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायालय अाणि खंडपीठाने अटकपूर्व जामीन फेटाळला हाेता. त्यामुळे ते १६ जून राेजी न्यायालयात शरण अाले. त्यानंतर त्रयस्थ अर्जदार यशवंत पवार यांनी पाटील यांच्या जामिनावर हरकत नोंदवली होती. त्यामुळे न्यायालयाने त्यांचे म्हणणे शनिवारपर्यंत सादर करण्याचे अादेश दिल्याने पाटील यांच्या जामिनावर शुक्रवारी निर्णय झाला नाही. शनिवारी दुपारी ३.३० वाजता त्यांच्या अाईचा अंत्यविधी हाेणार हाेता. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला.

त्यामुळे त्याअगाेदर तरी जामीन मिळावा, अशी अाशा कार्यकर्त्यांना हाेती. त्यामुळे शनिवारी सकाळपासूनच कार्यकर्त्यांनी न्यायालय अाणि िजल्हा कारागृह परिसरात गर्दी केली हाेती. या वेळी त्यांच्या चेहऱ्यावर सकाळी भीती त्यानंतर जामिनाच्या निकालाची उत्सुकता हाेती. सरकारतर्फे अॅड. अनिल पाटील यांनी तर बचाव पक्षातर्फे अॅड. प्रदीप देशमुख, त्रयस्थ अर्जदारातर्फे अॅड. प्रमाेद पाटील, अॅड. हारुल देवरे यांनी काम पाहिले.

पुढील स्लाइडवर वाचा, आमदार गुलाबराव पाटील जेलमध्ये, अर्ध्या तासात आईने सोडले प्राण

बातम्या आणखी आहेत...