आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आमदार गुलाबराव पाटील जेलमध्ये, अर्ध्या तासात आईने सोडले प्राण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- म्हसावद येथील शिक्षण संस्थेच्या प्रकरणात संशयित आरोपी तथा शिवसेनेचे आमदार गुलाबराव पाटील यांच्या एका दिवसाच्या पोलिस कोठडीची मुदत शुक्रवारी संपली. त्यानंतर न्यायालयाने त्यांची न्यायालयीन काेठडीत रवानगी केली आहे. पाटील हे दुपारी वाजता कारागृहात दाखल झाले. तर त्यानंतर अर्ध्याच तासात त्यांच्या आई दगुबाई पाटील (वय ८२) यांचे निधन झाले.

पाटील यांना एमआयडीसी पोलिसांनी शुक्रवारी दुपारी न्यायालयात हजर केले. तपासाधिकारी पोलिस उपनिरीक्षक सचिन बागुल यांनी रिमांड नोट सादर केली. त्यात पाटील यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी मिळावी, असा उल्लेख केला होता. त्यानुसार न्यायालयीन कोठडी सुनावण्यात अाली. पुढील पाच मिनिटांतच आमदार पाटील यांनी जामीन अर्ज दाखल केला. या अर्जावर लागलीच सुनावणी घेण्याची विनंतीही त्यांनी न्यायालयाला केली होती. या अर्जावर सरकार पक्ष, तपासाधिकाऱ्यांचा खुलासा मागवून दुपारी वाजता सुनावणी घेण्याचे आदेश केले. दुपारी २.५० ते ३.५० या वेळेत जामीन अर्जावर युक्तिवाद झाला. त्यावर जामिनावर शनिवारी निर्णय देऊ, असे न्यायालयाने सांगितले. दरम्यान, ३.५४ वाजता आमदार पाटील न्यायालयातून बाहेर पडले कारागृहाकडे रवाना झाले. वाजेच्या सुमारास ते कारागृहात पोहचले तर इकडे ४.३० वाजता त्यांच्या माताेश्री दगुबाई पाटील यांचे पाळधी येथे निधन झाले. काही दिवसांपासून त्या आजारी होत्या.
पुढील स्लाईडवर वाचा... गुलाबराव पाटील यांची कारागृहात का रवानगी करण्यात आली... वाचा घटनाक्रम....

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)