आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shiv Sena Party Chief Udhav Thackeray At Jalgaon On 28 Dec

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसोबत पदाधिकार्‍यांची 28 रोजी बैठक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- धुळे येथील दौरा ऐनवेळी रद्द झाल्याने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत आयोजित बैठक होऊ शकली नव्हती. परंतु 28 डिसेंबर रोजी औरंगाबाद येथे जळगाव जिल्ह्यातील पदाधिकार्‍यांची बैठक आयोजित करण्यात आल्याची माहिती जिल्हाप्रमुख किशोर पाटील यांनी दिली.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर पक्षाची जबाबदारी सांभाळणारे उद्धव ठाकरे यांची पक्षप्रमुखपदी निवड झाली. याला आता वर्ष उलटले असून या काळात ठाकरे यांचा जळगाव जिल्ह्यात एकही दौरा झालेला नाही. त्यामुळे शिवसैनिकांमध्ये ठाकरेंच्या भेटीची आस लागली आहे. धुळे येथील दौरा रद्द झाल्यानंतर पक्षप्रमुख ठाकरेंची भेट केव्हा? असा प्रo्न उपस्थित केला जात होता. परंतु 28 डिसेंबर रोजी औरंगाबाद येथे जिल्ह्यातील पदाधिकार्‍यांसोबत चर्चा करण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. यात संघटन बळकटीसह जिल्ह्यातील वेगवेगळ्या विषयांवर चर्चा होणार आहे.