आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्जमाफीस पात्र ठरणारे 89 लाख शेतकरी शिवसेना मोजून घेणार- उद्धव ठाकरे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाराेळ्यातील मेळाव्यात बाेलताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे. - Divya Marathi
पाराेळ्यातील मेळाव्यात बाेलताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे.
जळगाव - ‘मुख्यमंत्र्यांनी राज्यातील ८९ लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर केली आहे. यासाठी प्रत्येक बँकेपुढे शिवसैनिक टेबलखुर्ची टाकून बसतील व  कर्जमाफीसंदर्भात शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी साेडवून दिल्या जातील. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनामध्ये लाभार्थी शेतकऱ्यांची यादी सरकारकडून मागवून ती शेतकऱ्यांपर्यंत पाेहाेचवली जाणार अाहे.  जेणेकरून सर्व लाभार्थ्यी या याेजनेचा लाभ मिळताेय की नाही याचे अाॅडिटही शिवसैनिकांमार्फत केले जाईल,’ अशी माहिती शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी दिली. धरणगाव येथे अायाेजित शेतकरी संवाद अभियानाच्या जाहीर सभेमध्ये ते बाेलत हाेते.   
 
या सभेत उद्धव ठाकरे यांनी भाजपसह काँग्रेस अाणि राष्ट्रवादीवर सडकून टीका केली. शेतकरी कर्जमाफी याेजनेची १०० टक्के अंमलबजावणी करणे हे शिवसेनेचे ध्येय अाहे. सत्तेत असलाे तरी सत्तेचा जनतेला, शेतकऱ्यांना खरेच लाभ हाेताेय किंवा नाही हे पाहणे अामची जबाबदारी अाहे. मुख्यमंत्र्यांनी घाेषणा केल्याप्रमाणे ८९ लाख शेतकऱ्यांना ३४ हजार काेटी रुपये मिळाले किंवा नाही हे अाम्ही तपासू. बँका थकबाकीदार शेतकऱ्यांना वसुलीसाठी घरावर जप्तीची नाेटीस डकवतात. मात्र शिवसेना बँकेवर किती लाेकांना कर्जमाफी दिली यासंदर्भात नाेटीस डकविणार अाहे. विराेधक शिवसेनेला दाेन ताेंडी साप म्हणजे गांडूळ म्हणून टीका करतात. मात्र हेच ‘गांडूळ’ शिवसेना शेतकऱ्यांचा मित्र म्हणून काम करीत अाहे, असा टाेलाही ठाकरेंनी विराेधकांना लगावला.
 
२०१७ पर्यंत द्या कर्जमाफी
कर्जमाफीचे निकष दरराेज बदलत अाहेत. सन २०१२ एेवजी अाता मागे जाऊन मुख्यमंत्र्यांनी २००९ पर्यंतचे थकबाकीदार शेतकरी या याेजनेसाठी पात्र असल्याचे म्हटले अाहे. शेतकऱ्यांना देण्याची मनात इच्छा असेल तर मागे जाऊन उपयाेग नाही. दाेन वर्षे मागे जाण्यापेक्षा एक वर्ष पुढे या. ३० जून २०१६ पर्यंतचा निकष ३० जून २०१७ पर्यंत वाढवून देण्याची गरज असल्याचा सल्ला उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना दिला आहे.
 
१० हजार तातडीने मिळवून द्या
राज्यात दुबार पेरणीदेखील फेल जाण्याची शक्यता अाहे. कर्जमाफीबाबत अजून कार्यवाही नाही. त्यामुळे शिवसेनेच्या मंत्र्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत १० हजार रुपयांच्या कर्जाचा विषय लावून धरावा. शेतकऱ्यांना १० हजारांचे कर्ज कसे देता येईल याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे ठाकरे या वेळी म्हणाले.
 
पाकिस्तानचे थाेबाड फाेडा
पाकिस्तानच्या गझलकार, कलाकार, खेळाडूंसाठी सरकारी खर्चाने संरक्षण देता, त्यांच्यासाठी पायघड्या घालता अन् अमरनाथ यात्रेकरूंवरील गाेळीबार सहन करता. केंद्रात दणकट, तगडा माणूस पंतप्रधानपदी बसवूनही काँग्रेसपेक्षा वेगळे काहीच करीत नाहीत. यापूर्वी पाकिस्तानचा बुरखा फाडला म्हणता; मग अाता पाकिस्तानात शिरून गाेळ्या घाला अाणि त्यांचे थाेबाड फाेडा, असे अाव्हान ठाकरे यांनी केंद्राला दिले.

पुढील स्लाइडवर वाचा.. कर्जमुक्तीत पारदर्शकता पहिजे म्हणजे पाहिजे; उद्धव ठाकरेंनी उगारला सरकारवर आसूड...
 
हे ही वाचा,
बातम्या आणखी आहेत...