आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shiv Sena Signature Compaign Against Municipal Corporation

‘आयुक्त हटाव’साठी आज शिवसेनेतर्फे स्वाक्षरी मोहीम

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे - महापालिकेचेप्रभारी आयुक्त के.व्ही.धनाड यांच्याविरुद्ध शिवसेनेने आंदाेलन सुरू केले आहे. त्यानुसार शुक्रवारी सकाळी १० वाजता ‘महापालिका बचाव, आयुक्त हटाव’साठी स्वाक्षरी मोहीम घेण्यात येणार आहे.

दि.३, रोजी प्रत्येक विभागात ‘आयुक्त हटाव’ मोहिमेत नागरिकांची स्वाक्षरी घेण्यासाठी शिवसेना पदाधिकारी घरोघरी फिरणार आहेत. दि.६ एप्रिल रोजी आरोग्य विभागात जाऊन संबंधित अधिका-यांच्या दालनात शहरातील विविध भागात साचलेला कचरा आणण्यात येणार आहे. दि.७ एप्रिल रोजी महापालिकेच्या प्रमुख रुग्णालयासह इतर दवाखान्यांत पुरेसे डॉक्टर, कर्मचारी औषधसाठा उपलब्ध नसल्याने आयुक्तांचा धिक्कार केला जाईल. याप्रसंगी अतुल सोनवणे, प्रा.शरद पाटील, भूपेंद्र लहामगे, बापू शार्दूल, सुभाष देवरे, डॉ.माधुरी बाफना, संजय जाधव, संजय गुजराथी, नरेंद्र परदेशी, प्रदीप कर्पे, रवी काकड, महेश मिस्तरी आदी उपस्थित राहतील.