आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मिशन 2014 : महाराष्ट्रभर भगवा झेंडा फडकवा, 80 दिवसांचा कालावधी - गुलाबराव पाटील

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भडगाव - लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या भरघोस यशानंतर आता शिवसैनिकांनी मिशन 2014 च्या विधानसभेसाठी आतापासून जोमाने तयारी करा व महाराष्ट्रात भगवा झेंडा फडकावण्यासाठी कार्यकर्त्यांनी एकजूट होऊन कामाला लागावे, असे आवाहन शिवसेनेचे उपनेते गुलाबराव पाटील यांनी भडगाव येथे आयोजित शिवसेना कार्यालयाचे उद्घाटन व कार्यकर्ता मेळाव्याप्रसंगी केले.

व्यासपीठावर माजी आमदार आर. ओ. पाटील, आ. चिमणराव पाटील, रावसाहेब पाटील, अल्पसंख्याक आघाडी जिल्हा प्रमुख इम्रान अली सय्यद, शेतकरी आघाडीचे अरुण पाटील, महिला आघाडीचे महानंदाताई पाटील, देविदास पाटील, राजेंद्र पाटील, प्रकाश सोमवंशी, पाचोरा तालुका प्रमुख दिनकर देवरे, पाचोरा नगराध्यक्ष पंडित शिंदे, पुष्पाताई परदेशी, युवासेना जिल्हाधिकारी प्रीतेश ठाकूर, अजबराव पाटील, जि.प. सदस्य श्रावण लिंडायत, उपनगराध्यक्ष आनंद जैन, नथ्थू अहिरे, दीपक राजपूत, रघुनाथ महाजन, हिंमत पाटील, माजी नगराध्यक्ष शशिकांत येवले, सुनील देशमुख, गणेश परदेशी आदी उपस्थित होते. गुलाबराव पाटील यांनी मनोगतात विधानसभेच्या निवडणुकीत किशोर पाटील हेच संभाव्य उमेदवार असल्याचे त्यांंनी स्पष्ट केले तर कार्यकर्त्यांनी जनतेच्या सेवेसाठी वेळ दिला पाहिजे तरच त्यांच्यावरील विश्वास दृढ होऊ शकतो.

बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितल्याप्रमाणे नागरिकांचे प्रश्न सोडवणारी सेना आम्ही तयार केली होती म्हणून कार्यालय किती चकचकीत आहेत यापेक्षा तेथून किती ताकदीने काम होते याकडे नागरिक लक्ष देऊन असतात, असे सांगत युवा सेनेने कामाला लागले पाहिजे. जि.प. सदस्य प्रकाश सोमवंशी यांना आपल्या मनोगतात बोलताना सांगितले की, पक्ष देईल तो उमेदवार आम्हास चालेल त्यासाठी जबाबदारी उचलून काम करू, असे त्यांनी सांगितले.

मी अजून रिटायर्ड नाही
माजी आमदार आर. ओ. पाटील यांनी शिवसेनेचे महत्त्व विशद करताना सांगितले की, शिवसेना ही केवळ राजकीय संघटना नसून ती सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कांच्या संरक्षणासाठी, महिलांच्या संरक्षणासाठी झटणारी संघटना आहे. शिवसेनेचे कार्यालय हे जनतेचे न्यायालय झाले पाहिजे. शिस्त व सेवाभाव जोपासताना शिवसैनिकांनी व्यसनापासून दूर असावे. आताची वेळही सांगण्याची नाही तर काम करण्याची आहे. शिवसेना कार्यकर्त्यांनी शिस्त बाळगलीच पाहिजे,
असे मतही त्यांनी मांडले.

विधानसभेसाठी 80 दिवस बाकी
विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीला 80 दिवसांचा कालावधी बाकी असून ग्रामीण भागातील प्रत्येक खेड्यांपर्यंत शिवसैनिकांचा नारा गुंजला पाहिजे, असे यावेळी कार्यकर्त्यांनी सांगितले. येणारी निवडणूक ही अस्तित्वाची लढाई असून प्रत्येक दिवस हा महत्त्वाचा असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
कॉन्फरन्सची व्यवस्था
किशोर पाटील यांनी आपल्या भाषणात उद्धव ठाकरे यांचे भविष्यातील स्वप्नांचा उजाळा करून दिला. येणा-याकाळात स्पर्धा परीक्षांवर भर देऊन कार्यालयांमध्ये शिक्षण, बुथ व शाखा प्रमुखांशी स्वत: उद्धव ठाकरे बोलणार असून त्यासाठी प्रत्येक कार्यालयात व्हिडिओ कॉन्फरन्सची सुविधा करण्याचे काम सुरू आहे. यामुळे पक्ष प्रमुखांना कार्यकर्त्यांशी जवळीक निर्माण करण्यासाठी कॉन्फरन्सचा वापर करण्यात येणार आहे.