आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shivsena Party President Udhav Thackeray Comming Up Jalgaon

उद्धव ठाकरेंना जळगावात आणण्याचे नियोजन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे 10 डिसेंबर रोजी जळगाव दौर्‍यावर येत असल्याचे वृत्त आहे. पक्षप्रमुखाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर ते पहिल्यांदाच जळगावात येत आहेत. महापालिका निवडणुकीसाठी गत मार्च महिन्यात पक्षप्रमुख ठाकरे यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते; परंतु त्या वेळी दोन वेळा त्यांची सभा रद्द झाली. त्यामुळे त्यांच्या दौर्‍याकडे जिल्ह्यातील शिवसैनिकांचे लक्ष लागून होते. दरम्यान, 9 डिसेंबर रोजी धुळे महापालिका निवडणुकीतील शिवसेना उमेदवारांच्या प्रचारार्थ ते धुळय़ात येत आहेत. त्यानंतर दुसर्‍या दिवशी 10 डिसेंबर रोजी त्यांच्या जळगाव दौर्‍याचेही नियोजन पक्षातर्फे सुरू आहे. या दौर्‍यात पक्षसंघटन मजबूत करण्यासंदर्भात ते कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. दरम्यान, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर उद्धव ठाकरे हे पहिल्यांदाच जळगाव दौर्‍यावर येणार असल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. यापूर्वी जुलै महिन्यात त्यांच्या दौर्‍यासंदर्भात चर्चा झाली होती.