आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रस्ता अडवून चक्क बोळीत थाटली दुकाने, दाणा बाजारातील धक्कादायक प्रकार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - गाेलाणी फुले मार्केटमध्ये स्वच्छतागृहात दुकाने केल्याची घटना ताजी असताना अाता दाणा बाजारात अाता दाेन बाेळींचा शाेध लागला अाहे. फुले मार्केटमध्ये जाण्यासाठी तसेच जुन्या बसस्थानकाकडे निघणाऱ्या बाेळीमध्ये बेकायदा दुकाने बांधल्याची बाब उघडकीस अाली अाहे. पालिकेच्या पथकाने सुरू केलेल्या सर्वेक्षणात दुकाने बांधून पालिकेच्या वहिवाटीचा रस्ताच बंद केल्याचा गंभीर प्रकार निदर्शनास अाला अाहे. दाेन दिवसांत रस्ता माेकळा करण्याचे फर्मान साेडण्यात अाले.

 

एकेकाळी श्रीमंत नगरपालिका अशी अाेळख असलेल्या जळगाव महापालिकेची सध्याची स्थिती अत्यंत बिकट अाहे. अापली मालमत्ता काेणती याचाही शाेध अाता अधिकाऱ्यांना घ्यावा लागत अाहे. त्यातूनच व्यापारी संकुलांमधील स्वच्छतागृहांना कुलूप लावून त्या ठिकाणी दुकाने उघडण्याचे कमाई करण्याचे प्रकार नुकतेच लक्षात अाले. तत्कालीन पालिकेच्या पदाधिकाऱ्यांच्या अाशीर्वादामुळेच हे शक्य झाल्याची अाेरड अाता केली जात अाहे. दरम्यान, जिल्हाधिकारी तथा प्रभारी अायुक्त किशाेर राजेनिंबाळकर यांच्या अादेशानंतर अपर अायुक्त राजेश कानडे यांच्या नेतृत्वात शहरात अतिक्रमण हटाव माेहीम राबवली जात अाहे. उपायुक्त चंद्रकांत खाेसे यांच्या मार्गदर्शनाखाली २० अभियंत्यांचे पथक दाणा बाजारात सर्वेक्षण करत असताना दाणा बाजारात बाेळीत दुकान बांधून रस्ताच बंद केल्याचे उघडकीस अाले.

 

दाणाबाजारातील दुकानदारांचे सहकार्य
साेमवारीपाेलिस उपअधीक्षक सचिन सांगळे यांच्याकडे झालेल्या बैठकीनंतर दाणा बाजार असाेसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी सहकार्य करण्याचा शब्द पाळला. त्यानुसार पालिकेच्या अतिक्रमण विभागाने दुकानासमाेरील अाेटे ताेडण्यास सुरुवात केली. जेसीबीने सर्व दुकानांसमाेरील उंच भाग काढून टाकण्याची कारवाई सुरू केली अाहे.

 

रस्ता माेकळा करण्यासाठी दिवसांची मुदत
उपायुक्तखाेसे यांनी संबंधित बाेळ बंद करणाऱ्या दुकानदारांना दाेन दिवसांत रस्ता माेकळा करण्याचे अादेश दिले. धन्याचे व्यापारी असलेल्या दुकान भाड्याने घेतले असून दुकानाचा मालक कर्नाटकचा असल्याचे सांगण्यात अाले. बाेळींमधील दुकानदारांकडून मनपा मालमत्ता कराची वसुलीदेखील करत असल्याचे लक्षात अाले अाहे.

 

ही अाहेत ती दाेन दुकाने
दाणाबाजारातील धन्याचे व्यापारी हिंदुस्तान ट्रेडर्स तसेच जयहिंद ट्रेडिंग कंपनीचे तेलाचे गाेडावून असलेली दाेन दुकाने चक्क नागरिकांच्या साेईसाठी असलेल्या बाेळीत बांधण्यात अाली अाहेत. गेल्या २५ ते ३० वर्षांपेक्षा अधिक कालावधीपासून ही बाेळ बंद करण्यात अाल्याने अनेकांच्या लक्षातही येत नव्हते; परंतु सर्वेक्षण सुरू असताना अभियंता शकील शेख, सतीश परदेशी सुहास चाैधरी यांना गुप्त माहिती मिळाल्यानंतर हा सावळा गाेंधळ उघडीस अाला. दुकानांच्या मागे अजूनही बाेळ शाबूत असून दुकान पाडल्यानंतर पुन्हा बाेळीचा वापर सुरू हाेऊ शकणार अाहे.

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, फोटोज....

बातम्या आणखी आहेत...