आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shop Issue Councilors With BJP Leader Meeting Today

नगरसेवकांसाेबत भाजप नेत्यांची अाज बैठक; गाळेप्रश्नी चर्चा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- व्यापारी संकुलांतील गाळ्यांबाबत राज्य शासनाने दिलेल्या निर्णयावर धाेरण ठरवण्यासाठी लवकरच विशेष महासभा हाेणार अाहे. तसेच त्यात सगळ्यात जास्त अडचण झालेल्या भाजप नगरसेवकांना मार्गदर्शन करून भूमिका ठरवण्यासाठी शुक्रवारी सकाळी वाजता महसूलमंत्री एकनाथ खडसे अामदार सुरेश भाेळे यांच्यासाेबत ‘मुक्ताई’ बंगल्यामध्ये बैठकीचे अायाेजन करण्यात अाले अाहे.

महापालिका क्षेत्रातील १८ व्यापारी संकुलांपैकी महसूल विभागाच्या जागेवरील चार वगळता महापालिकेच्या जागेवरील १४ मार्केटबाबत शासनाने अादेश देऊन संभ्रम निर्माण केल्याचा अाराेप सर्वसामान्य गाळेधारकांकडून हाेत अाहे. चार मार्केटसाठी वेगळी भूमिका अाणि इतरांना वेगळा न्याय का? असा सवालही उपस्थित हाेत अाहे. त्यात खाविअाकडून भाजपला काेंडीत पकडण्याचा प्रयत्न सुरू अाहे. शहराच्या विकासाचा महापालिकेच्या उत्पन्नाचा हा विषय असल्याने भाजप नगरसेवकांची बाेलतीच बंद झाली अाहे. खाविअा गाळे ताब्यात घेण्याची कारवाई करावी यासाठी प्रयत्नशील अाहे. त्यामुळे अागामी विशेष महासभेत काय निर्णय घ्यावा? यासाठी थेट भाजपचे वरिष्ठ नेते मार्गदर्शन करणार अाहेत. महसूलमंत्री खडसे अामदार भाेळे यांच्या उपस्थितीत गाळेप्रश्नावर विचारमंथन हाेणार अाहे.

गटनेत्यांनाघातले साकडे
भाजपचेगटनेते डाॅ.अाश्विन साेनवणे यांना १४ व्यापारी संकुलांतील गाळेधारकांच्या प्रतिनिधींनी नुकतेच भेटून याबाबत कैफियत मांडली. शासन दाेन व्यापाऱ्यांमध्ये भेदभाव का करतेय? सगळ्यांना समान न्याय द्यावा, अशी मागणी गाळेधारकांनी साेनवणेंकडे केली.