आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चॉकलेट चोरल्याचा आरोप, दुकानदारासह तिघांना चोप

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- राधाकृष्णमंगल कार्यालयात लग्नास आलेल्या एका मुलाला गणेशवाडीतील एका दुकानदाराने चॉकलेट चोरल्याच्या संशयातून मारहाण करण्यात आली होती. त्याने ही घटना आईला सांगितल्यानंतर संतापलेल्या वऱ्हाडी मंडळीने दुकानातील तिघांना चांगलाच चोप दिला. या वेळी आमदाराने मध्यस्थी केल्याने वादावर पडला पडला. पंरतु या घटनेमुळे परिसरात गुरूवारी दुपारी दोन तास तणाव निर्माण झाला होता.
सोनार कुटुंबाचा गुरुवारी पांडे चौकातील राधाकृष्ण मंगल कार्यालयात विवाह सोहळा होता. लग्नासाठी तेजस वाघ (वय १३, रा. जानकीनगर) हा त्याच्या आई सोबत आला होता. त्याला लग्न समारंभास होम हवनासाठी तूप घ्यायला नातेवाइकांनी पाठवले. तो गणेशवाडीतील सपना प्रोव्हिजनमध्ये तूप घेण्यासाठी गेला. त्या वेळी त्याने उरलेल्या दोन रुपयांचे चॉकलेट दुकानदाराकडे मागितले. दुकानदाराने त्याला तू स्वत:च्या हाताने बरणीतून घेऊन घे, असे सांगितले. तो चॉकलेट घेत असताना त्याला पुरुषोत्तम आहुजा सनी आहुजा यांनी जास्त चॉकलेट घेतल्याच्या कारणावरून मारहाण केली. त्यामुळे तेजस रडत आई ऊर्मिला पंकज वाघ यांच्याकडे गेला. त्याने सर्व घटना सांगितली. त्यामुळे संतापलेले वऱ्हाडी दुकानदाराला जाब विचारण्यासाठी गेले.
तेथे वाद झाल्याने वऱ्हाडीनी गुरुमुख आहुजा, सनी आहुजा आणि पुरुषोत्तम आहुजा यांना बेदम मारहाण केली. यात सनीच्या डोक्यात कॅरेट मारल्याने त्याचे डोके फुटल्याने तो जखमी झाला आहे. दोन तास हा वाद सुरू होता.

- मुलाने चॉकलेट चोरले नाही तरी त्याला मारले. त्यामुळे मी यासंदर्भात पोलिसात तक्रार देणार आहे.
ऊर्मिला वाघ, तेजसची आई
आमदार भोळेंची शिष्टाई
लग्नासाठी आलेल्या आमदार सुरेश भोळे यांना वाद झाल्याचे कळल्यानंतर ते तत्काळ घटनास्थळी पोहोचले. तेथे त्यांनी दोन्ही गटांच्या मंडळींची समजूत काढली.
बातम्या आणखी आहेत...