आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वच्छ जळगाव: दुकानासमाेर डस्टबिन ठेवा अन्यथा रोज 500 रुपये दंड

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- हागणदारी मुक्तीतमागे पडलेल्या जळगाव महापालिकेच्या कारभाराची लक्तरे वेशीला टांगली गेल्यामुळे खडबडून जागे झालेल्या महापालिका प्रशासनाने ३१ ऑगस्टची डेडलाइन डोळ्यासमोर ठेवून ‘स्वच्छ जळगाव, हागणदारीमुक्त जळगाव’साठी ‘करा या मराे’च्या भूमिकेत कामाला सुरुवात केली अाहे. रस्त्यावर कचरा पडण्यास कारणीभूत ठरणाऱ्या घटकांचा शाेध घेतला जात अाहे. स्वच्छता मोहिमेचा एक भाग म्हणून गुरुवारपासून शहरातील सर्वच दुकानदारांना डस्टबीन ठेवणे बंधनकारक करण्यात अाले अाहे. अन्यथा दररोज ५०० रुपये दंड अाकारण्यात येणार अाहे. 

घनकचरा व्यवस्थापन तसेच हागणदारीमुक्तीमध्ये राज्यात मागे पडलेल्या जळगाव शहराची गेल्या अाठवड्यात राज्याचे उपसचिव सुधाकर बाेबडे यांनी पाहणी केली हाेती. सलग तिसऱ्या तपासणीतही काेणताही सकारात्मक बदल झाल्याने त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली हाेती. शहर हागणदारीमुक्तीसाठी ३१ अाॅगस्टची डेडलाइन देण्यात अाल्याचे स्पष्ट करून ताेपर्यंत शहर हगणदारीमुक्त केल्यास शासनाद्वारे महापालिकेला देण्यात येणारे अनुदान बंद करण्याचा इशारा दिला हाेता. अनुदान बंद झाल्यास पालिका कर्मचाऱ्यांचा पगारावरच गंडांतर येणार अाहे. त्यामुळे खडबडून जागे झालेल्या महापालिकेच्या अाराेग्य विभागाने अाता काेणाचीही गय करण्याचा निर्णय घेतला अाहे. शहरातील पाणटपरी, चहा विक्रेते, किराणा, सलून, हाॅकर्स, खासगी महापालिकेच्या व्यापारी संकुलातील दुकानदार तसेच कापड, धान्य, खाद्यपदार्थ, इलेक्ट्रिक या शिवाय सर्वच व्यावसायिक शाेरूमधारकांना डस्टबीन ठेवणे बंधनकारक केले अाहे. ज्या दुकानांसमाेर डस्टबीन नसेल अशा विक्रेत्यांना दुकानदारांना प्रतिदिन ५०० रुपये दंड ठोठावण्यात येणार अाहे. 

स्वच्छतेच्या धडाकेबाज मोहिमेंतर्गत बुधवारी एकूण १३ जणांना दंड ठोठावण्यात आला. त्यापैकी डी मार्ट चाैक तसेच स्टेडियम काॅम्प्लेक्स मधील ११ जणांना उघड्यावर कचरा टाकल्याप्रकरणी १२५० रुपये दंड करण्यात अाला, तर फुले मार्केटमधील चंदुलाल रसवंतीच्या दाेन दुकानांमध्ये उसाच्या चिपडाची घाण टाकल्याप्रकरणी २००० रुपये दंड करण्यात अाला. अाराेग्याधिकारी डाॅ. विकास पाटील, प्रभाग अधिकारी सुशील साळुंखे, मुख्य स्वच्छता निरीक्षक एस. पी. अत्तरदे, निरीक्षक एल. बी. धांडे, अानंद साेनवाल अादींनी ही कारवाई केली. 

नागरिकांनाही सक्ती 
अाराेग्यविभागानेप्रत्येक व्यावसायिकाला डस्टबीन सक्ती केल्याची घाेषणा बुधवारी सायंकाळी केली. नागरिक आणि विक्रेत्यांनी डस्टबीनमध्येच कचरा टाकावा, रस्ते दुकानाचा परिसर स्वच्छ ठेवावा. यासंदर्भात गुरुवारी सकाळपासून तपासणी सुरू करण्यात येणार अाहे. ज्या दुकानांसमाेर डस्टबीन नसेल त्यांना प्रत्येकी ५०० रुपये दंड करण्यात येणार अाहे. 
- किशाेरराजे निंबाळकर, प्रभारी अायुक्त 

अभियंता, लिपिक, मेकॅनिकची फौज 
अाराेग्यविभागातील सफाई कामगार, अाराेग्य निरीक्षक, मुकादम यांच्यासाेबतीला अाता स्वच्छता अभियानाच्या कामासाठी प्रशासनाने वेगवेगळ्या विभागातील अभियंता, लिपिक, मजूर, मुकादम, मेकॅनिक, नाकेदार, वाॅचमन, फिटर, वायरमन अशा ३४ अधिकारी कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली अाहे. १४ अाॅगस्टपासून या कर्मचाऱ्यांना त्यांच्या नियुक्तीच्या ठिकाणी हजर हाेण्याचे अादेश दिलेे अाहेत. यात अाजी-माजी नगरसेवकांचे नातलग असलेल्या कर्मचाऱ्यांनाही स्वच्छता अभियानाच्या महत्त्वाच्या कामासाठी जुंपण्यात आले आहे. 

कचरापेटी ठेवणे यांना बंधनकारक 
शहरातीलपाणटपरी, चहा विक्रेते, किराणा, सलून, हाॅकर्स, खासगी महापालिकेच्या व्यापारी संकुलातील दुकानदार तसेच कापड, धान्य, खाद्यपदार्थ, इलेक्ट्रिक या शिवाय सर्वच व्यावसायिक शाे-रूमधारकांना कचरापेटी ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे. 
बातम्या आणखी आहेत...