आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाहतुकीची कोंडी - शॉपिंग सेंटर्सने गिळले रस्ते

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमळनेर - शहरातील अनेक शॉपिंग सेंटर्स बाहेरील रस्ते अतिक्रमणाने गिळंकृत केले आहेत. पार्किंगची सोयच नसल्याने रस्त्यावर अनिर्बंध पार्किंग केलेली वाहने वाहतूक कोंडीस निमित्त ठरतात. याबाबत पालिकेने धोरण तयार करण्याची खरी गरज आहे.

शहरातील रस्त्यांवर वाढती पार्किंग व अतिक्रमणामुळे सर्वत्र गर्दी व गोंगाटाचेच वातावरण दिवसभर असते. त्यात दिवसभर फळे व इतर साहित्य विक्री करणा-या लोटगाड्या फेरीवाले वाहतुकीच्या कोंडीस कारणीभूत ठरतात. पर्यायाने वारंवार किरकोळ अपघात होणे, मोठ्या वाहनांना अडचण येणे, पादचा-यांनाही अडथळा येणे अशा बाबी नित्याच्या झाल्या आहेत.
शहरातील एकाही शॉपिंग सेंटर्सला पार्किंगची सोयच नाही. त्यामुळे भररस्त्यावर बेधडक वाहने तासन्तास उभी असतात. याबाबत पालिकेने एकदाही पोलिस, शॉपिंग सेंटर्स, गाळ्यांचे मालक अथवा व्यापा-यांची बैठक घेऊन चर्चा केलेली नाही.

काय करावयास हवे?
इतर शहरांप्रमाणे अरुंद रस्ते पाहता याबाबत सर्व दुकानदार, गाळेमालक, पोलिस व पालिका प्रशासन यांची संयुक्त बैठक आयोजित करून त्यात निश्चित पार्किंगचे धोरण आखावे. त्यात वारनिहाय पार्किंगची बाजू ठरवावी. दंडात्मक कारवाईसाठी एक कंत्राटदार द्यावा. अथवा पालिकेचे कर्मचारी कामाला लावले तर त्यात कारवाईही होईल व पालिकेला उत्पन्न तर मिळेल आणि शिस्तही लागेल.

पार्किंग सुविधा सक्तीची
पूर्वी पार्किंगबाबत गांभीर्याने पाहिले जात नव्हते. मात्र, नोव्हेंबर 2013पासून शॉपिंग सेंटर्स व फ्लॅट सिस्टिम मालकांना पार्किंगची सुविधा करणे सक्तीचे केले आहे. याबाबत पालिका आता दक्षता घेत आहे. पार्किंगशिवाय नाहरकत दाखला दिली जात नाही. विजय शिंदे, अभियंता, बांधकाम विभाग
- फेरीवालासंदर्भात सर्वेक्षण झाले आहे. अर्ज विक्रीस आहे. मुख्याधिका-यांची बदली झालेली असून नवे मुख्याधिकारी हजर झाल्यानंतर ते निर्णय घेतील. भाऊसाहेब देशमुख, पालिका प्रशासन अधिकारी