आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दीपपर्वामुळे वाढली बाजारात तेजी, लक्ष्मीपूजनासाठी सर्वत्र लगबग

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे - दीपपर्वाने बाजारपेठेतील उलाढाल वाढविली आहे. त्यामुळे गेल्या चार दिवसांपासून उत्साहाचे वातावरण आहे. परिणामी, बाजारात सगळ्याच क्षेत्रांमध्ये नवीन मालाची आवक मोठ्या प्रमाणात झाली आहे.
शहरात दिवाळीच्या काळात कपड्यांच्या बाजारपेठेत मोठी उलाढाल होते. सुरत तसेच अहमदाबाद येथून यंदाही मोठ्या प्रमाणात नवीन कपड्यांचा स्टाॅक मागविण्यात आला. रविवारपासून बुधवारपर्यंत यातील बहुतांश स्टॉक संपलेला आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांना ऐनवेळी धावपळ करावी लागत आहे. फराळाच्या बाजारपेठेतही यंदा मोठी उलाढाल झाली. घरगुती फराळ तयार करणाऱ्यांसह नवीन सहा ते सात कंपन्यांनीही यंदा बाजारपेठेत नव्याने पाऊल ठेवले. त्याचबरोबर सराफा बाजारातही तेजी दिसून येत आहे. मुळात उतरलेल्या भावाचा फायदा करून घेण्यासाठी ग्राहकांचा मानस आहे. सध्या तर अगदी किरकोळ वस्तूंचीही विक्री होत आहे. लक्ष्मीपूजनासाठी या वस्तू घेतल्या जात असल्याचे दिसून आले. लक्ष्मीपूजनाला झेंडूच्या फुलांना मोठ्या प्रमाणावर मागणी असते. त्यामुळे शेतकऱ्यांनी फूलतोडणीचे नियोजन सुरू केले आहे. फुलांना असलेली मागणी वाढली आहे.

बातम्या आणखी आहेत...