आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाडव्याला ‘तोळा-मास’च खरेदी; सुवर्ण बाजारात ५० टक्के उलाढाल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - देशासह जिल्ह्यात सराफा व्यावसायिकांनी बंद पुकारला असून केवळ जळगाव शहरातच सुवर्णपेढ्या सुरू अाहेत. त्यामुळे गुढीपाडव्याच्या मुहूर्ताला खरेदीसाठी जिल्हाभरातून नागरिक शहरात येतील प्रचंड उलाढाल हाेईल, असा विश्वास सराफांना हाेता; पण ताे विश्वास फाेल ठरला असून, गतवर्षाच्या तुलनेत सुवर्ण बाजारात यंदा केवळ ५० टक्केच उलाढाल झाली अाहे. राज्यातील दुष्काळी परिस्थिती सराफांच्या बंदचे वातावरण याला जबाबदार असल्याचे साेन्याच्या जाणकारांचे म्हणणे अाहे.
अबकारी करासह विविध मागण्यांसाठी देशभरातील सुवर्णकारांनी मार्चपासून बेमुदत बंद पुकारलेला अाहे. त्यात जळगाव शहरासह जिल्ह्यातील सराफ असाेसिएशननेही सहभाग घेतला हाेता. मात्र, जळगाव शहर सराफ असाेसिएशनने १८ मार्चपासून बंदमधून बाहेर पडत शहरातील सुवर्णपेढ्या सुरू केल्या अाहे, तर जिल्ह्यातील सुवर्णकार देशपातळीवरील असाेसिएशनने पुकारलेल्या बंदमध्ये सहभागी असून त्यांचा बंद सुरूच अाहे. जिल्ह्यात बंद असल्यामुळे शुक्रवारी गुढीपाडव्याला जळगाव सराफा बाजारात माेठ्या प्रमाणात उलाढाल हाेईल, अशी अपेक्षा व्यापाऱ्यांना हाेती. परंतु, ती फाेल ठरली अाहे. मुहूर्तावर गतवर्षांच्या तुलनेत फक्त ५० टक्केच उलाढाल झाली अाहे. तर इलेक्ट्रॉनिक बाजारात मुहूर्तावर खरेदी करण्यासाठी ग्राहकांची मोठी गर्दी झाली होती.

गेल्या वर्षाच्या तुलनेत फारच कमी उलाढाल
^दरवर्षी गुढीपाडव्याला ग्राहक माेठा प्रतिसाद देताे. मात्र, यंदा गेल्या वर्षाच्या तुलनेत केवळ ५० टक्केच उलाढाल झालेली अाहे. दुष्काळी परिस्थिती लग्नसराई नसल्याचाही हा परिणाम अाहे. अजय ललवाणी, अध्यक्ष,शहर सराफ असाेसिएशन

खरेदीवर दुष्काळी परिस्थितीचा परिणाम
राज्यातसर्वत्र दुष्काळी परिस्थिती अाहे. लाेकांच्या हातात पैसाच नाही. त्याचा परिणाम साेने खरेदीवर थेट हाेताे. त्यामुळे साेने खरेदीचा मुहूर्त असूनही अनेकांनी १० ग्रॅम साेन्याएेवजी एक-दाेन ग्रॅमची वस्तू घेऊन मुहूर्त साधला.

मुहूर्ताची नाही, नियमित खरेदीच
जळगाव सराफ बाजारातील १२५ सुवर्णपेढ्यांच्या माध्यमातून दरराेज दीड ते दाेन काेटींची उलाढाल हाेते. गुढीपाडव्याला ही उलाढाल दुप्पट असते. परंतु, शुक्रवारी मुहूर्ताची खरेदी अगदी नगण्यच हाेती. मुहूर्ताएेवजी नियमितच खरेदी झाल्याचे सुवर्णकारांनी सांगितले.