आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गाळे प्रकरणात भाजपच्या नगरसेवकांची कोंडी, नेत्यांच्या उपस्थितीत होणार बैठक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- शहरातील मुदत संपलेल्या गाळ्यांबाबत धोरण ठरवण्यासाठी पुढच्या आठवड्यात विशेष महासभेचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यापूर्वी प्रशासनाने गाळे ताब्यात घेण्याची कारवाई करण्याचा ठरावही करण्यात आला.
भाजपची सत्ता असलेल्या राज्य शासनाने निर्णय घेताना दिलेले दोन वेगळे निर्णय व्यावसायिकांच्या पचनी पडायला अडचणीचे ठरत आहे. शासनाच्या भूमिकेचे समर्थन केल्यास जनतेची नाराजी आणि विरोध केल्यास नेत्यांचा रोष ओढवायचा, अशी अवस्था भाजप नगरसेवकांची झाली आहे. त्यामुळे नेमकी काय भूमिका घ्यावी, याबाबत सध्या मंथन सुरू अाहे.

मुदत संपलेल्या गाळ्यांचा प्रश्न तीन वर्षांपासून गुंतागुंतीचा करण्यात आला. यात सर्वात महत्त्वाची भूमिका राजकीय पक्षांची राहिली आहे. खाविअाने कर्ज केल्याचा अाराेप भाजपकडून होत राहिला तर गाळ्यांचा प्रश्न लांबवण्यात भाजप नेत्यांचा पत्रव्यवहार कारणीभूत ठरल्याची भावना उमटू लागली अाहे. प्रश्न साेडवण्यापेक्षा ताे जटील करण्यावर अधिक भर दिल्याचा राेष सर्वसामान्यांकडून व्यक्त हाेताेय.

नगरसेवकसंभ्रमात : व्यापारीसंकुलांबाबत प्रशासनाच्या अभिप्रायासह लवकरच विशेष महासभा हाेणार आहे. त्यामुळे या सभेत भाजप काय बाजू मांडते हे महत्त्वाचे ठरणार आहे. अडीच वर्षांनी महापालिकेची निवडणूक आहे. त्यामुळे आज व्यक्त हाेणाऱ्या भूमिका भविष्यासाठी परिणामकारक ठरू शकतील अशी भीतीही व्यक्त होत अाहे. पालिकेच्या बाजूने बाेलायचे तर नेते दुखावतील अाणि शासनाच्या निर्णयाचे समर्थन केले तर खाविअाला प्रचाराला मुद्दा मिळेल, अशी संभ्रमावस्था सध्या भाजपच्या नगरसेवकांमध्ये पाहायला मिळत आहे. त्यामुळे येत्या दाेन िदवसांत नेत्यांच्या उपस्थितीत बैठक हाेऊन चर्चा हाेण्याची शक्यता अाहे.