आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शॉर्ट सर्किटमुळे तीन घरांना लागली आग

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ - शहरातीलन्यू सतारे भागातील ओंकारेश्वर मंदिराजवळील परिसरात, अचानक वीजदाब वाढल्याने तीन घरांना आग लागली. गुरुवारी मध्यरात्री अडीच ते तीन वाजेदरम्यान घडलेल्या या घटनेमुळे घरांमधील वीज उपकरणांसह अन्य साहित्य जळून खाक झाले.
शहरातील न्यू सतारे भागात दिनेश जगदीश दास राजेश जगदीश दास यांच्या मालकीच्या घरांमध्ये निशांत सुभाष पळसकर हे भाडेकरू राहतात. गुरुवारी मध्यरात्री भाडेकरी पळसकर बेडरुममध्ये झोपले होते. रात्री अचानक वीजदाब वाढल्याने बंद रूममधील केबलने पेट घेतला. त्यामुळे लागलेल्या आगीने रौद्ररूप धारण केल्याने टीव्ही, फ्रीज, शोकेस, कपाट, गॅस शेगडी, कपडे तसेच धान्यासह इतर जीवनाश्यक वस्तू जळाल्या. यासह घरमालक राहत असलेल्या खोलीतही आग लागल्याने साहित्य जळून खाक झाले. रात्री अचानक लागलेल्या या आगीचा प्रकार नागरिकांना कळताच पालिकेच्या अग्निशामक बंबास पाचारण करण्यात आले. त्यानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. दरम्यान, वीज वितरण कंपनीने फीडरवरील वीजपुरवठा बंद केला होता. त्यानंतर आग लागलेल्या घरांचा पुरवठा बंद करून उर्वरित भागात वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला. याबाबत शहर पोलिसांत नोंद नाही. वीज वितरणातील बिघाडांमुळे होणारे हे प्रकार नेहमीचे आहे. संभाजीनगर, म्युनिसिपल पार्क, जळगाव रोडवरील श्रीनगर, मोहितनगर आदी भागांतही असे प्रकार घडले आहेत.

प्राणहानी टळली
पळसकरयांच्या घरातील बंद असलेल्या रूममध्ये त्यांची आई रत्नमाला पळसकर आणि सात वर्षीय मुलगा कपीश पळसकर हे दोघे कायम झोपतात. मात्र, गुरुवारी हे दोघे बाहेरगावी गेले होते. यामुळे आग लागली त्या वेळी बंद रूममध्ये कोणीही नसल्याने प्राणहानी टळली.

तक्रार आलेली नाही
न्यूसतारे भागातील आगीबाबत महावितरण कंपनीकडे कोणत्याही प्रकारची नोंद नाही. कोणीही याबाबत तक्रारही केलेली नाही. गुरुवारी रात्री वाजेदरम्यान पोलिसांचा निरोप मिळाल्याने वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. मात्र, १० मिनिटांनी तो पूर्ववत झाला. आगीच्या घटनेबाबत तक्रार आल्याल, कार्यवाही केली जाईल. बी.एन. सोनवणे, सहायक अभियंता,