आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विसर्जन मिरवणुकीवर शॉर्ट फिल्म

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - गणेश विसर्जन मिरवणुकीतील उत्साह हा दरवर्षी वेगळाच असतो. प्रत्येक शहरात, गावांत हा उत्सव साजरा केला जातो. काही प्रसिद्ध अशा गणेश मंडळांच्या मिरवणुका सगळीकडे पाहायला मिळतात. मात्र, त्या-त्या गावाचे वैशिष्ट्य वेगळे असते. जळगावच्या विसर्जन मिरवणुकीचा उत्साह कॅमेरामध्ये कैद करण्यात आला आहे. तो प्रत्येकाच्या स्मरणात राहावा, याकरिता त्यावर ५.३० मिनिटांची शॉर्ट फिल्म तयार करण्यात येत आहे.

शहरातील छायाचित्रकार प्रकाश मुळे यांच्या संकल्पनेतून रवी तायडे, राहुल इंगळे, धर्मेश भोसर यांच्यातर्फे ही शॉर्ट फिल्म तयार केली जात आहे. या चार जणांनी मिळून रविवारी झालेल्या विसर्जन मिरवणुकीचे छायाचित्रण केले आहे. त्यामुळे जळगावच्या गणरायाच्या मिरवणुकीने आधुनिकतेचे रुप घेतले आहे. ७५० फूल बॉडी फूल फ्रेमच्या कॅमेऱ्यांनी शूटिग करण्यात आले. कॅमेराच्या विविध अँगलने हे शूटिंग करण्यात आले. येत्या तीन ते चार दिवसांत ही शॉर्ट फिल्म तयार होणार आहे.

यू ट्यूबवर टाकण्याचा मानस
मुळेयांची अनेक दिवसांची ही इच्छा होती. वैयक्तिक संग्रहासाठीच ते शॉर्ट फिल्म तयार करीत आहेत. त्यामुळे गणेश विसर्जन मिरवणूक २०१५ ची त्यांनी संधी साधली. योग्य पद्धतीने ही शॉर्ट फिल्म तयार झाल्यास ‘यू ट्यूब’वर हा व्हिडिओ टाकण्याचा त्यांचा मानस आहे. त्याचप्रमाणे मिरवणुकीत काढलेल्या फोटोंचा वेगळा अल्बमही तयार करणार आहेत.

अनेक क्षण स्मरणात राहतील
यंदा महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणात दिसून आला. वेगवेगळे ढोल पथक आकर्षणाचा केंद्र ठरले. हे अनेक क्षण स्मरणात राहण्यासाठी आम्ही हा उपक्रम राबविला आहे. तसेच जळगाव बदलायला लागले आहे. गर्दी वाढली त्यामुळे रस्ते कमी पडायला लागले आहेत. मात्र, यंदा कोण मोठी मूर्ती बसवेल, याची स्पर्धा मंडळात होती. ही कुठेतरी चुकीची आहे. म्हणजे विसर्जित करता येईल, अशीच मूर्ती बसवा. प्रकाश मुळे.

हे दिसणार शॉर्ट फिल्ममध्ये
या शॉर्ट फिल्ममध्ये काही बाबी महत्त्वाच्या आढळून आल्या. यंदा महिलांचा मोठ्या प्रमाणातील सहभाग, जळगावच्या मिरवणुकीत आधुनिक स्वरुप, मंडळांचा उत्साह, संध्याकाळी अचानक जळगावकरांची गर्दी, कुटुंबासोबत नागरिकांचा भर, बाहेरील पथकांचा समावेश असल्याने नावीन्यपूर्ण भरलेली प्रत्येकाची शैली, प्रत्येक जण वेगवेगळ्या प्रकारे आनंद घेतो. त्याचे चित्रण, देखावे, लहान मुलांचा उत्साह यात दिसणार आहे. त्याचप्रमाणे मेहरूण तलावावरीलही चित्रण यात असेल.