आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

श्रावण महिन्यात उपवास करा, पण जरा जपून

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - श्रावण लागला आहे, या महिन्यात धार्मिक विचार करणारे बहुतांश नागरिक या महिन्यात उपवास करतात, तर वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवणारे डाएट करतात. अति डाएट व उपवास करणार्‍या 100 पैकी 30 व्यक्तींना हाइपोग्लायसीमिया हा आजार होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे नागरिकांना काळजी घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.

उपवास व डाएट या दोन्ही संकल्पना जवळपास एकच आहेत. आठवड्यातील सातही दिवस उपवास करणारे असतात, तर विशिष्ट वारानुसार काही जण उपवास करतात. उपवास असला की, सकाळी भरपेट जेवायचे आणि रात्री तळलेले पदार्थ खायचे. हा प्रकार आरोग्याच्या दृष्टीने घातक आहे. यामुळे अनेक आजारांना आपण स्वत:हून निमंत्रण देत असतो. साधारणपणे उपवास करणार्‍या व्यक्तींना हाइपोग्लायसीमिया हा आजार उद्भवतो.


हाइपोग्लायसीमिया म्हणजे काय?
उपाशी राहिल्याने शरीरातील साखरेचे प्रमाण कमी होते. यामुळे चक्कर येणे, अस्वस्थ वाटणे, घबराट होणे, घाम येणे, भूक लागणे, अस्पष्ट दिसणे, हृदयाचे ठोके वाढणे, बेशुद्ध पडणे आदी व्याधी उद्भवतात. या प्रकाराला हाइपोग्लायसीमिया आजार म्हणतात. याशिवाय उपवासाच्या दिवशी सकाळी जास्त खाल्ल्याने व सायंकाळी तेलकट तुपकट खाल्ल्याने लठ्ठपणा वाढतो. हा आजार पुढे गंभीर स्वरूप रूप धारण करतो. मधुमेहाने ग्रस्त असलेल्या व्यक्तींना साधारणपणे हाइपोग्लायसीमिया म्हणजे रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होऊन व्यक्ती बेशुद्ध पडू शकतो.

मधुमेहींनी उपवास टाळा
मधुमेह असणार्‍या व्यक्तींनी उपवास करूच नये. उपवास केलाच तर अधिक कडक उपवास न करता, फळे व दुधाचा आहार घेत राहावे. थकवा आल्यास तत्काळ ग्लुकोज द्यावे. डॉ. परीक्षित बाविस्कर, फिजिशियन


काय करायला हवे?
0 रक्तामधील साखरेचे प्रमाण तपासा.
0 शंका असेल तेव्हा वैद्यकीय सल्ला घ्या.
0 हलका आहार आरोग्यास लाभदायी.


चार तासांनी थोडे खा
उपवास करणे किंवा डाएट करणे चुकीचे नाही, पण या दरम्यान आहार घेताना खूप काळजी घ्यायला पाहिजे. नाही तर हा प्रकार विविध आजारांना आमंत्रण देणारा असतो. त्यासाठी उपवासाच्या दिवशी चार तासांनी थोडे थोडे खाणे आरोग्यासाठी लाभदायी ठरते. संदीप उपाध्ये, आहार तज्ज्ञ