आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाप्पाच्या स्वागताची जोरदार तयारी, बाजारात चिनी वस्तुंचा झगमगाट !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - ‘श्रीं’च्या मूर्तीला साजेशी सजावट, मखर, क्रिस्टल माळा, आरास करण्यासाठी भक्तांची जय्यत तयारी सुरू आहे. बाजारपेठेत यंदा प्रथमच सजावटीचे चिनीसाहित्य मोठय़ा प्रमाणात आले आहे. यात माळांच्या विविध प्रकारांचा समावेश आहे.

चारखांब आणि कळस अशा मखराचा ट्रेड बदलला आहे. मखरांमध्ये विविध प्रकार दिसून येत आहेत. विविध रंगसंगतीच्या थर्माकोलच्या मखरांना विशेष मागणी आहे. यात गडद रंगाच्या कार्व्हिग मखरांना खास मागणी आहे. 100 रुपयांपासून 10 हजार रुपयांपर्यंतचे 70 प्रकारचे तयार मखर बाजारात उपलब्ध आहेत. यात पेशवाई खांब, कमळ, मखर, सोनपरी मखर, सूर्यासन असे प्रकार आहेत. थर्माकोलच्या मखरात मूर्ती व्यवस्थित बसवता येते आणि तिला धक्का लागण्याचीही भीती नसते. चॉकलेट आणि मेटॅलिक रंगाच्या थर्माकोल कार्व्हिंगला जास्त मागणी आहे. याशिवाय घरच्या घरी मखर तयार करण्यासाठी थर्माकोलचे खांब, कळस, बॉर्डर, आर्च, ब्रिडिंग, जाळी, चक्र, कार्व्हिग डिझाईन्स उपलब्ध आहेत.

गणपतीसाठी तयार केल्या जाणार्‍या अलंकारात यंदा मेटलचा जास्त वापर दिसत आहे. मेटलचेच परंतु आकर्षक अलंकार सर्वसामान्यांना परवडतील अशा किमतीत उपलब्ध आहेत. मेटलला सोनेरी मुलामा देऊन बनवण्यात आलेल्या या अलंकारामध्ये काही नवीन डिझाइन्सही उपलब्ध आहेत. गणपतीसाठी खास फेटा, नक्षीकाम केलेले उपरणे, विविध प्रकारचे मोत्यांचे हार, मुकुट तसेच खडे आणि क्रिस्टल्स वापरून तयार केलेले सुंदर दागिने आहेत.

गणरायाच्या आगमनाचे वेध
शहरात गणरायाच्या स्वागताची जोरदार तयारी सुरू असून सजावटीच्या वस्तूंच्या बाजारात चिनी मालाचे वर्चस्व दिसून येत आहे.विविध प्रकार आणि रूपातील आकर्षक गणेशमूर्ती नागरिकांना भुरळ घालत आहेत. शाळांनीही स्वागताची जोरदार तयारी चालवली आहे.