आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

झाली गावामंधी दाटी। राम अन् धनाच्या दर्शनाले।।

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - श्रीराम रथोत्सवात भक्तांची अलोट गर्दी, चाकाची रिंग निखळल्याने तास खोळंबा
दुसऱ्या दिवशीही झुंबड, बँकांमध्ये २०० कोटींचा भरणा; महावितरण ६, मनपाची कोटींची कमाई
जळगावातील रस्ते शुक्रवारी दिवसभर नागरिकांनी फुलले होते. कुणास श्रीराम दर्शनाची तर कुणास पैसे काढण्याची आणि वीज बील, घरपट्टी भरण्याची घाई झाली होती. कार्तिकी एकादशीच्या मुहूर्तावर भक्तांच्या अपूर्व उत्साहात, वाजत-गाजत प्रभु श्रीरामाचा रथाने दुपारी डौलाने प्रस्थान केले . तर दुसरीकडे दोन दिवसांपासून लक्ष्मी दर्शनाच्या प्रतिक्षेत असलेले नागरिक सकाळपासूनच बँकामध्ये रांगा लावून उभे होते. दोन्ही ठिकाणी प्रचंड गर्दी झाली होती. एकीकडे श्रीराम रथोत्सव सुरु होताच डाव्या बाजूचे चाक निखळले तर दुसरीकडे मोजकेच एटीएम सुरुच झाल्याने बँकांची यंत्रणा निखळली. अखेर तासांच्या खोळंब्यानंतर प्रभु श्रीरामचंद्रांचा रथ मार्गस्थ झाला तर सायंकाळी बँकांमधली गर्दीही ओसरली. बँकामध्ये २०० कोटींचा भरणा ७० कोटींचे वितरण झाले. तर महावितरणची मनपाची सुमारे कोटींची कमाई झाली.
प्रतिनिधी | जळगाव
श्रीराममंदिर संस्थानतर्फे शुक्रवारी १४४ वर्षांची परंपरा लाभलेला अन‌् शहराचे ग्रामदैवत असलेल्या श्रीराम रथाेत्सव जल्लाेषात पार पडला. महाआरतीनंतर दुपारी वाजून मिनिटांनी सेवेकऱ्यांनी रथ ओढला अन‌् सर्वत्र जय श्रीराम जय श्रीरामांचा जयघोष झाला. ‘बाेला बजरंग बली की जय, जय श्रीरामा...’च्या जयजयकाराने सुवर्णनगरी दुमदुमली. हा उत्सव पाहण्यासाठी शहरासह जिल्हाभरातून भक्त माेठ्या संख्येने अाले हाेते.
श्रीरामांचा जयघोष; सुवर्णनगरी दुमदुमली
रिंग चाकापासून वेगळी करून पांजरपोळच्या मराठे वेल्डिंग वर्क्सवर नेऊन रिंगच्या गॅपमध्ये वेल्डिंग करण्यात आली. सायंकाळी रिंग पुन्हा चाकावर बसवण्यात आली. त्यानंतर सायंकाळी ६.१५ वाजता मंगेश महाराजांच्या हस्ते चाकांची पूजा करून रथ मार्गस्थ झाला, असे रथोत्सवाचे अध्यक्ष भालचंद्र पाटील यांनी सांगितले.

दुपारी २.४५ ते सायंकाळी ६.१५ या वेळेत रथ एकाच जागेवर असल्यामुळे पुढील सर्वच धार्मिक कार्यक्रमांनाही उशीर झाला. सुरुवातीला ही रिंग जागेवरच ठोकून दुरुस्त करण्यात आली. पण रथाचा मार्ग पाहता रात्री उशिरा पुन्हा काही अडचण येऊ नये, म्हणून रथ जागेवरच थांबवून रिंग पूर्णपणे दुरुस्त करण्याचा रथोत्सव समितीतर्फे निर्णय घेण्यात आला.

दुपारी श्रीराम मंदिरापासून रथाेत्सवाला प्रारंभ झाला. रथ भोईटे गढी, कोल्हेवाडा, आंबेडकरनगरमार्गे दुपारी २.४५ वाजता तेलीवाड्याजवळ अाला. या ठिकाणी रथाच्या उजव्या बाजूच्या चाकाची लोखंडी रिंग उतरल्याचे मोगरी लावणाऱ्या राजू यांच्या लक्षात आले. त्यामुळे रथ थांबवण्यात आला.

सायंकाळी चाकांची पूजा केल्यानंतर रथ मार्गस्थ
आयकर अधिकारी दिसताच सराफांनी केली प्रतिष्ठाने बंद
केंद्रसरकारने चलनातून पाचशे हजार रुपयांच्या नोटा रद्द केल्यानंतर जळगावच्या सराफ बाजारात चढ्या भावाने सोन्याची विक्री झाल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. इतर शहरांमध्ये आयकर विभागातर्फे धाडसत्र सुरू आहे. दरम्यान, शुक्रवारी रथोत्सवाच्या गर्दीमध्ये काही सराफा व्यावसायिकांना आयकर अधिकारी फिरत असल्याचे दिसून अाले. त्यानंतर काही सराफा व्यावसायिकांनी त्यांची प्रतिष्ठाने बंद केली. त्यामुळे बराच वेळ सराफ बाजारात धावपळ झाल्याचे चित्र होते. दरम्यान, सराफ बाजारात आयकर विभागाची धाड पडल्याची केवळ अफवा असल्याचे शहर सराफा असोसिएशचे अध्यक्ष अजय ललवाणी यांनी ‘दिव्य मराठी’ला सांगितले.
दुसऱ्या दिवशीही झुंबड, बँकांमध्ये २०० कोटींचा भरणा; महावितरण ६, मनपाची कोटींची कमाई
५००अाणि १००० रुपयांच्या नाेटा बदलवून देण्यासाठी जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत, खासगी सहकारी बंॅकांमध्ये ग्राहकांच्या रांगा लागल्या हाेत्या. व्यवहार थांबल्याने किमान दिनचर्या, दैनंदिन गरजा भागतील एेवढे तरी चलन हाती असावे, म्हणून जळगावकर सकाळपासून बँकांच्या रांगांमध्ये हाेते. सर्वस्वी बँकांवर भिस्त असल्याने अाणि एका खात्यातून एका वेळी १० हजार रुपये काढण्याची मर्यादा असल्याने एकाच कुटुुंबांतील एकापेक्षा जास्त खातेदार चलन हातचे करण्यासाठी वेगवेगळ्या बँकांच्या रांगेत दिसत हाेते. दरम्यान शुक्रवारी बंॅकांमधून जळगावकरांना सुमारे ५० काेटी रुपये वितरित करण्यात अाले, तर एटीएममधून २० काेटी रुपये काढण्यात अाले. तर बंॅकांमध्ये २०० काेटींंचा भरणा करण्यात अाला अाहे. स्टेट बंॅक, एचडीएफसी अॅक्सिस या तिन्ही बंॅकांचे एटीएम सुरू हाेते, तर इतर बंॅकांचे एटीएम मात्र बंद हाेते.
शहरातील बँकांची अशी होती भरणा रक्कम
जनताबंॅकेमध्ये ४४ कोटी, पीपल्स बंॅकेमध्ये ५१ कोटींची रक्कम जमा करण्यात आली. सेंट्रल बंॅकेमधून ५०० रूपयांच्या ४३८३ तर हजार रूपयांच्या ९६५ नोटा बदलून दिल्या. जिल्हा मध्यवर्ती बंॅकेत ६५ लाखांचा भरणा करण्यात आला.
बातम्या आणखी आहेत...